लुईस बर्जर कंपनीच्या माजी उपाध्यक्षांना अटक
By Admin | Updated: August 4, 2015 01:00 IST2015-08-04T01:00:34+5:302015-08-04T01:00:34+5:30
गोव्यातील जैका प्रकल्पात लाचखोरी केलेल्या लुईस बर्जर कंपनीचे माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती यांना गुन्हा अन्वेषण विभागाने सोमवारी अटक केली.

लुईस बर्जर कंपनीच्या माजी उपाध्यक्षांना अटक
पणजी : गोव्यातील जैका प्रकल्पात लाचखोरी केलेल्या लुईस बर्जर कंपनीचे माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती यांना गुन्हा अन्वेषण विभागाने सोमवारी अटक केली. लाच प्रकरणाची त्यांना पूर्ण कल्पना होती आणि कंत्राट मिळविण्यासाठी लाच देण्याचे कारस्थान त्यांनीच रचल्याचे तपासातून उघड झाले आहे.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची गुन्हा अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सोमवारी दुसऱ्यांदा चौकशी झाली. मोहंती हे लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्षही होते. गोव्यातील मंत्र्यांना दिलेल्या कथित लाच प्रकरणाच्यावेळी कंपनीच्या पश्चिम भारतातील व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर होती. जैका प्रकरणात कंत्राट मिळविण्यासाठी प्रसंगी लाच देण्याचा पर्याय वापरण्यासाठीही त्यांनी अधिकाऱ्यांना पूर्ण मोकळीक दिली होती. हे सर्व प्रकरण त्यांच्या देखरेखीखाली घडले होते, असा दावा गुन्हा अन्वेषण विभागाने केला आहे.