राज्यराणीच्या थांब्याने सहा फेऱ्यांना लेटमार्क
By Admin | Updated: December 16, 2015 02:33 IST2015-12-16T02:33:50+5:302015-12-16T02:33:50+5:30
मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नाशिककरांची सोय करण्यासाठी मनमाड-एलटीटी राज्यराणी सीएसटीपर्यंत सुरू करण्यात आली. मात्र ही ट्रेन सीएसटीपर्यंत सुरू करण्यात आल्यानंतर आधीच
राज्यराणीच्या थांब्याने सहा फेऱ्यांना लेटमार्क
मुंबई : मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नाशिककरांची सोय करण्यासाठी मनमाड-एलटीटी राज्यराणी सीएसटीपर्यंत सुरू करण्यात आली. मात्र ही ट्रेन सीएसटीपर्यंत सुरू करण्यात आल्यानंतर आधीच लोकल सेवेला फटका बसत असतानाच यात आणखी मोठी भर पडणार आहे.
या ट्रेनला ठाणे स्थानकात
थांबा नसून प्रवाशांच्या मागणीनुसार तो थांबा देण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र
तसे प्रयत्न झाल्यास आणखी सहा लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागणार आहे.
मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नाशिककरांची सोय करण्यासाठीच मनमाड-एलटीटी राज्यराणी ट्रेन १0 मार्च २0१२ पासून सुरू करण्यात आली. या ट्रेनचा नाशिककरांना फायदा झाला असला तरी ही ट्रेन एलटीटीपर्यंत येत असल्याने मनस्तापही सहन करावा लागत होता. अखेर १२ आॅक्टोबरपासून सीएसटीपर्यंत ही ट्रेन चालविण्यास सुरुवात झाली.
प्रवाशांच्या मागणीनुसार सीएसटीपर्यंत सेवा चालविण्यात येत असल्याने सध्या दोनपेक्षा जास्त लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. ही सेवा देऊनही प्रत्यक्षात प्रवाशांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचेही समोर आले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे याआधी एलटीटीपर्यंत धावणाऱ्या या ट्रेनला ठाणे स्थानकात थांबा देण्यात येत होता. मात्र सीएसटीपर्यंत सेवा देताच ठाणे स्थानकाचा थांबा काढून टाकण्यात आला. त्यामुळे काही प्रवाशांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार ठाणे स्थानकात या ट्रेनला पुन्हा थांबा देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
30 टक्क्यांपेक्षाही कमी प्रवासी मिळत असल्याने मार्च २0१५ मध्ये मनमाड राज्यराणी ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सीएसटीपासून ही ट्रेन सुरू करण्याची मागणी प्रवाशांची असल्याने त्याचा विचार करत ट्रेन बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.