सोनिया गांधींचे मुंडेंच्या पत्नीला पत्र
By Admin | Updated: June 4, 2014 01:20 IST2014-06-04T01:20:23+5:302014-06-04T01:20:23+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाला पत्र लिहून शोकसंवेदना व्यक्त केल्या.

सोनिया गांधींचे मुंडेंच्या पत्नीला पत्र
>नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाला पत्र लिहून शोकसंवेदना व्यक्त केल्या.
जीवनात काही घटना अशा घडतात, त्यावर कुणाचेही नियंत्रण नसते आणि ते दु:ख सोसावेच लागते, असे सोनिया गांधी यांनी मुंडेंच्या पत्नी प्रज्ञा यांना लिहिलेल्या पत्रत म्हटले आहे.
एका सामान्य कुटुंबातील गोपीनाथ मुंडे यांनी कठोर परिश्रम, नम्र वागणूक आणि मागासवर्गीयांसाठी कटिबद्धता यामुळे सामाजिक आणि राजकीय जीवनात छाप सोडली, ही बाब सर्वाना प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी मुंडेंच्या निधनाबद्दलच्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
राहुल गांधी
भाजपा मुख्यालयात
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपा मुख्यालयात आले होते. उत्तराखंडचे नेते हरित रावत त्यांच्यासोबत होते. गांधी यांनी या वेळी उपस्थित राहून गोपीनाथ मुंडे यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रार्थना केली.
राष्ट्रपतींकडून पुष्पांजली
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मुंडेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुष्प पाठविले होते. अटबिहारी वाजपेयींकडूनही पुष्प पाठविण्यात आले.