शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात...; भाजपा कार्यकर्त्याचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 11:39 IST

देवेंद्र फडणवीस यांना पोस्टाने हे पत्र पाठवले आहे. फडणवीसांची वेळ मागितली आहे निश्चित संध्याकाळपर्यंत भेटीची वेळ मिळेल आणि त्यांच्याकडे या भावना व्यक्त करू असं या कार्यकर्त्याने म्हटलं आहे.

पुणे – राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच कुजबुज सुरू आहे. राज्यातील या घडामोडीत सर्वाधिक आमदार असतानाही भाजपाला उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागत आहे. त्यात आता सत्तेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस भागीदार आल्याने निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांचे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याचबाबत भाजपाचे पुणे जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. सध्या हे पत्र खूप व्हायरल होत आहे.

नवनाथ पारखी म्हणतात की, देवेंद्र फडणवीस हे खूप चांगल्याप्रकारे महाराष्ट्रात काम करतायेत. परंतु या सत्तानाट्यामुळे भाजपाशी एकनिष्ठ असलेल्या जुन्या कार्यकर्त्यावर यामुळे अन्याय झालेला आहे त्यामुळे मी त्यांना पत्र लिहिलं आहे. या ५ प्रश्नांची चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे. मला खूप जणांचे फोन आले. अनेकांची ही भावना आहे. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक पक्षाची विचारधारा, घटना आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. या कार्यकर्त्यांसाठी आपण काय कराल यासाठी मी साद घातली आहे. अजित पवार यांना सोबत घेत त्यांच्यासोबत बसलो त्यामुळे पुणे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढेल की राष्ट्रवादीची हा कळीचा मुद्दा वाटतो असं त्यांनी सांगितले.

तसेच देवेंद्र फडणवीस यांना पोस्टाने हे पत्र पाठवले आहे. फडणवीसांची वेळ मागितली आहे निश्चित संध्याकाळपर्यंत भेटीची वेळ मिळेल आणि त्यांच्याकडे या भावना व्यक्त करू. पुणे जिल्ह्यात खूप आमदार आहेत ज्यांच्याकडे आम्ही मार्गदर्शक म्हणून पाहतो. तुम्ही बारामतीच्या मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात कदाचित पक्षातील कार्यकर्त्यांची तर जिरणार नाही ना हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न आहे असंही नवनाथ पारखी यांनी म्हटलं.

काय आहेत ५ प्रश्न?

  1. अजित पवार आणि त्यांचे सहकारी यांना सत्तेत सामावून घेऊन राष्ट्रवादीची ताकद वाढेल की भाजपाची?
  2. आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचे वाली आपण आहात मग आम्हाला ताकद देणे हे आपले काम नाही का?
  3. वेळ पडेल त्यावेळेस जेवणाची शिदोरीसोबत घेऊन आम्ही पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे संघटनेत महत्त्व काय?
  4. मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची तर जिरणार नाही ना..?
  5. भाजपाचे मंत्रिपदाच्या शर्यतीतील सहकारी आमदारांचे काय? ज्यांनी आजवर पक्षासाठी खूप काही केलंय?

जमलं तर जरूर उत्तर द्या साहेब अशी विनंती या पत्राद्वारे नवनाथ पारखी यांनी केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार