होऊ दे चर्चा, तुमच्या व्यंगचित्रची
By Admin | Updated: October 4, 2014 02:01 IST2014-10-04T02:01:29+5:302014-10-04T02:01:29+5:30
समाजमनाची नस अचूक जाणणा:या संवेदनशील मनाला कुंचल्याचा कलाविष्कार वश झाला, की व्यंगचित्रचा जन्म होतो. विसंगती हा विनोदाचा आत्मा आहे,

होऊ दे चर्चा, तुमच्या व्यंगचित्रची
>समाजमनाची नस अचूक जाणणा:या संवेदनशील मनाला कुंचल्याचा कलाविष्कार वश झाला, की व्यंगचित्रचा जन्म होतो. विसंगती हा विनोदाचा आत्मा आहे, असे म्हणतात. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय व्यवस्थेत विसंगतीची रेलचेल असणार आहे. तुमच्या तरल संवेदनांमधून नेमकेपणाने या अशा व्यंगांवर बोट ठेवणारे तुम्ही साकारलेले काटरून उभ्या महाराष्ट्राच्या चेह:यावर स्मितरेषा झळकवू शकते.
त्यासाठी विद्यमान राजकारणावर विशेषत: विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भाष्य करणारे तुम्ही काढलेले काटरून ‘लोकमत’ला इ-मेलने पाठवा. व्यंगचित्रसोबत त्याची कॅप्शन वा गॅगलाईन पाठविणो आणि तुमचे नाव तसेच वास्तव्याचे ठिकाण नमूद करणो आवश्यक आहे. दररोज सायंकाळी पाच वाजेर्पयत ’‘ं22ीेु’8ॅें्र’.ूे व ल्ल’्रल्ली’‘ें3ॅें्र’.ूे या इ-मेलवर आलेल्यांपैकी निवडक व्यंगचित्रंना वृत्तपत्र, ऑनलाइन आणि फेसबुक या लोकमतच्या व्यासपीठांवरून प्रसिद्धी दिली जाईल.