दिव्यात गँगमनचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: November 3, 2016 05:29 IST2016-11-03T05:29:31+5:302016-11-03T05:29:31+5:30
सहकाऱ्यांना पाणी घेवून जाताना एका गँगमनचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी दिव्यात घडली.

दिव्यात गँगमनचा अपघाती मृत्यू
ठाणे : सहकाऱ्यांना पाणी घेवून जाताना एका गँगमनचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी दिव्यात घडली. नागाव, दहिसर येथे राहणारे एकनाथ सुदाम मढवी (५३) असे त्यांचे नाव आहे. ते दुपारी दिवा स्थानकाजवळ सुरू असलेल्या रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी नेत होते. याचदरम्यान, जलद गतीच्या मार्गावर कल्याणहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने त्यांना धडक दिली. त्यांच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)