काँग्रेसला हव्या कळवा, मुंब्य्रात १० जागा

By Admin | Updated: January 21, 2017 02:51 IST2017-01-21T02:51:33+5:302017-01-21T02:51:33+5:30

मुंबईत होणाऱ्या बैठकीत मिळणार असले तरी आघाडीचं घोडं कळवा, मुंब्य्रातील जागांवरूनच अडले आहे.

Let Congress know the desired, 10 seats in Mumbra | काँग्रेसला हव्या कळवा, मुंब्य्रात १० जागा

काँग्रेसला हव्या कळवा, मुंब्य्रात १० जागा


ठाणे : ठाण्यात आघाडी होणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर शनिवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत मिळणार असले तरी आघाडीचं घोडं कळवा, मुंब्य्रातील जागांवरूनच अडले आहे.
काँग्रेसने कळवा, मुंब्य्रात १० जागांची मागणी केली आहे, तर राष्ट्रवादीने केवळ तीनच जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले. आघाडीची बोलणी पुढे सरकत असताना आता शहरातील ९५ जागांचे वाटप दोन्ही काँग्रेसमध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, कळव्यातील पाच प्रभागांमधून २०, तर मुंब्य्रातील चार प्रभागांतून १६ अशा एकूण ३६ जागांवर आघाडीची गाडी काही दिवसांपासून अडली आहे. मुंब्य्रात काँग्रेसचे सध्या दोन नगरसेवक असले तरी, कळवा-मुंब्य्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे इथल्या जास्तीतजास्त जागा राष्ट्रवादीला हव्या असून काँग्रेसला कळव्यातून एक आणि मुंब्य्रातून दोन जागा सोडण्याचीच तयारी राष्ट्रवादीने दाखवली आहे. मात्र, काँग्रेसने कळव्यातून चार आणि मुंब्य्रातून सहा अशा १० जागांसाठी आग्रह धरल्याचे सांगण्यात आले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संपूर्ण शहरातील आघाडीबाबत चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Let Congress know the desired, 10 seats in Mumbra