अण्णांक डे मोदींची पाठ
By Admin | Updated: May 24, 2014 03:06 IST2014-05-24T03:06:02+5:302014-05-24T03:06:02+5:30
सार्क’ देशांच्या प्रमुखांसह एकूण तीन हजार मान्यवरांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पण या मान्यवरांच्या यादीत अण्णा हजारे यांचा मात्र मोदींनी समावेश केलेला दिसत नाही

अण्णांक डे मोदींची पाठ
सुधीर लंके, अहमदनगर - ‘सार्क’ देशांच्या प्रमुखांसह एकूण तीन हजार मान्यवरांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पण या मान्यवरांच्या यादीत अण्णा हजारे यांचा मात्र मोदींनी समावेश केलेला दिसत नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत अण्णांना या सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले नाही. मोदी २६ मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र जगभरातील मान्यवरांना निमंत्रित करताना मोदी सरकारला अण्णांचा विसर पडला याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. अण्णांना केंद्र सरकारने पद्मश्री व पद्मभूषण किताब देऊनही गौरविलेले आहे. त्यामुळेही अण्णांना निमंत्रण येणे अपेक्षित होते. पण अद्याप असे निमंत्रण आलेले नाही. अण्णांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता अद्यापपर्यंत निमंत्रण आलेले नसल्याचे त्यांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत अण्णांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. ‘असली आझादी’ अभियानासाठी अण्णा शनिवारी बंगलोरला जात आहेत. त्यांचा नियोजित दौरा ठरला असल्यामुळे आता निमंत्रण मिळाले तरी त्यांच्या उपस्थितीबाबत शंका आहे.