शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

शिवरायांच्या प्रशासन कौशल्यावर धडा

By admin | Updated: February 20, 2016 03:09 IST

छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते. त्यांच्या याच क्षमतेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते. त्यांच्या याच क्षमतेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात आठ पानी धड्याचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात शिवछत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते, त्यांचा पराक्रम आणि युद्धकौशल्य चौथीच्या पुस्तकात शिकविले जात आहे. या पराक्रमाबरोबरच शिवरायांच्या काळात जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण, शब्दकोष आणि शिवकालीन तलावांची विशेष व्यवस्था होती. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रमही त्यांच्या काळात राबविला गेला. त्याचबरोबर दुष्काळ निवारण्याची यंत्रणाही त्यांच्या काळात होती. शौर्याबरोबरच शिवाजी महाराज हे कुशल प्रशासकही (मॅनेजमेंट गुरू) होते, हा इतिहाससुद्धा शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या उद्दिष्टाने पुढील शैक्षणिक वर्षापासून पुस्तकात तो धडा समाविष्ट करण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.सरकारला शिवाजी महाराजांचा विसर : नवाब मलिकनिवडणुकीत ‘शिवछत्रपती का आशीर्वाद; चलो चले मोदी के साथ’ अशी घोषणा देत सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारला शिवजयंतीच्या दिवशी मात्र छत्रपतींचा विसर पडला आहे. शुक्रवारी एकाही वृत्तपत्रातून शिवरायांच्या जयंतीची जाहिरात करण्यात आली नाही. ‘मेक इन इंडिया’साठी कोट्यवधींची उधळण करणाऱ्या सरकारकडे शिवजयंतीसाठी पैसा नसणे ही दुर्दैवाची बाब असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. जाहिरात न देणारे फडणवीस सरकार शिवस्मारकाबाबतही वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. मागील वर्षी शिवजयंतीला शिवस्मारकाचे भूमिपूजन करणार असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप शिवस्मारकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. निवडणूक काळात उठता-बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजपा सरकारमधील नेत्यांना निवडणुका संपल्यानंतर शिवाजी महाराजांचा विसर पडला असल्याची टीका मलिक यांनी केली आहे.