शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 06:23 IST

मुंबईच्या सहा, ठाणे जिल्ह्यातल्या तीन आणि पालघरची एक, अशा दहा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले.

मुंबई : मतदार यादीत नावे नाहीत, बायकोचे नाव एकीकडे, नवऱ्याचे नाव दोन किलोमीटर लांबच्या मतदार केंद्रात, मोबाइल केंद्रावर फोन न्यायचा की नाही, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याचे प्रश्न, अशा प्रचंड गदारोळ आणि गोंधळात मुंबई, ठाण्याच्या दहा लोकसभा मतदारसंघांत शेवटचा टप्पा पार पडला. यामुळे मतदानाचा टक्का तर वाढला नाहीच, उलट गोंधळाचा टक्का मात्र सर्वाधिक ठरला.

मुंबईच्या सहा, ठाणे जिल्ह्यातल्या तीन आणि पालघरची एक, अशा दहा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले. मुंबईतील अनेक मतदारसंघांत ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार घडले. ते बदलण्यात बराच वेळ गेला. मुंबई, कल्याण, पालघर या भागांत ईव्हीएम मशीन अतिशय धिम्यागतीने चालत असल्याच्या तक्रारी होत्या. 

रांगेतील उभ्या असणाऱ्यांना साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध नव्हते. कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची नावे मतदार यादीत नव्हती. तारे-तारकांना मतदान केंद्रावर व्हीआयपी वागणूक मिळत होती, त्याच्या उलट वागणूक ज्येष्ठ नागरिकांना मिळत होती. काही ठिकाणी मोबाइल मतदान केंद्रात नेता येणार नाहीत, अशी सक्ती केली गेली, तर काही ठिकाणी मोबाइल बंद ठेवून मतदानाला जाऊ दिले गेले.

निवडणूक कर्मचाऱ्यांचे उपाशीपाेटी कर्तव्यnमतदानासाठी रविवारी सकाळपासून मतदान केंद्रांवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना, तसेच पोलिसांना दिवसभर जेवायला मिळाले नाही. पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जातो, असे उत्तर देण्यात आले, पण कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र सोडायचे नाही, अशी त्यांच्यावर सक्ती होती. 

n१०० मीटरच्या अंतरातील खाण्यापिण्याची ठिकाणेदेखील बंद करण्यात आली होती. अशा वेळी कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी घरून डबे आणणे अपेक्षित असल्याचे उत्तर दिले गेले, पण निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरून कर्मचारी, अधिकारी, पोलिस बोलावण्यात आले होते. त्यांचे इथे घर नाही. अशांनी डबे आणायचे कुठून? यावर कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडे नव्हते. 

शेकडाे लाेक कंटाळून फिरले माघारीज्या मतदारांकडे मतदानाची स्लिप होती, त्यांचे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र तपासणे आणि ते त्यांचेच आहे की नाही, हे बघणे यात प्रचंड वेळ गेल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्राबाहेर दोन ते तीन तास लोकांच्या रांगा लागल्या.  

लोक कंटाळून रांगा सोडून घरी निघून गेल्याचेही चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. काही ठिकाणी मतदाराची उलट तपासणी केल्यासारखी चौकशी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या. ज्या ठिकाणी विरोधक आरडाओरड करत होते, तिथे मतदानाचा वेग वाढताना दिसत होता.

धुळ्यात दगडफेक, नाशिकमध्ये बाचाबाचीnनाशिक येथील एका मतदानकेंद्रावर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि उद्धवसेनेचे पदाधिकारी माजी आमदार वसंत गीते हे समोरासमोर भिडले. यावेळी गीते व फरांदे यांच्यात शाब्दिक चकमक होऊन अरेरावी सुरू होताच भाजप व शिंदेसेनेचे कार्यकर्ते व उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. 

nधुळ्यात बोगस मतदानाच्या संशयावरून नवभारत चौकात दगडफेक झाली. घटनेमागील नेमके कारण अस्पष्ट असले, तरी बोगस मतदानाच्या संशयावरून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात आली.

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानEVM Machineएव्हीएम मशीन