शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

एसटी महामंडळाच्या स्लीपर शिवशाहीच्या भाड्यामध्ये कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 20:29 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वातानुकूलित स्लीपर शिवशाही बसच्या प्रवासभाड्यात ३ रुपये ८५ पैशांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देएसटी महामंडळाकडून वातानुकूलित स्लीपर शिवशाही बसकडे प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वातानुकूलित स्लीपर शिवशाही बसच्या प्रवासभाड्यात ३ रुपये ८५ पैशांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पुर्वी या बसला प्रति टप्पा १५ रुपये २० पैसे मोजावे लागत होते. तसेच या बसचे भाडे यापुढे पाच रुपयांच्या पटीत आकारले जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे भाडे १५ रुपये असेल. तर लहान मुलांसाठी पाच रुपये भाडे आकारले जाईल.एसटी महामंडळाकडून वातानुकूलित स्लीपर शिवशाही बसकडे प्रवाशांना अधिक आकर्षित केले जात आहे. त्याअंतर्गत प्रवास भाडे कपातीसाठीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाला दिला होता. या प्रस्तावाला प्राधिकरणाने नुकतीच मंजुरी दिली. त्यानुसार सुधारीत भाडे दर दि. १३ फेब्रुवारीपासून लागु होणार आहेत. या बसचे सध्याचे दर प्रति टप्पा १५ रुपये २० पैसे आहेत. त्यामध्ये ३ रुपये ८५ पैशांची कपात करून ते ११ रुपये ३५ पैसे करण्यात आले आहेत. यामध्ये जीएसटी व इतर करांचा समावेश केल्यास हे भाडे १२ रुपये ८९ पैसे होते. मात्र, महामंडळाने भाडे दर पाच रुपयांच्या पटीत केला आहे. त्यानुसार अडीच रुपये ते पाच रुपयांपर्यंतची आकारणी पाच रुपये म्हणून करण्यात येईल. या सुधारीत दरानुसार प्रवाशांना पहिल्या टप्प्यासाठी १५ रुपये मोजावे लागतील. त्यानंतरच्या पुढील प्रत्येक टप्यासाठीही पाचच्या पटीतच भाडे आकारले जाणार आहे. सुधारीत दरानुसार दुसºया टप्प्यासाठी २४.७७ रुपये भाडे होते. पण पाचच्या पटीत २५ रुपये भाडे होईल. यानुसार तिसºया टप्प्यासाठी ३६.६६ रुपये होणारे भाडे ३५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. याच निकषाप्रमाणे पुढील भाडे दर ठरविण्यात आले आहेत. स्लीपर शिवशाही बसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येणाºया सवलतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. --------------असे असतील सुधारीत दर (रुपयांत)किमी        दर६        १५१०२        २०५१५०        ३००२०४        ४०५२५२        ५००३००        ५९५३५४        ७००४०२        ७९५४५०        ८९०५०४        १०००६००        ११९०७०२        १३९०८०४        १५९५९००        १७८५---------------------

टॅग्स :PuneपुणेShivshahiशिवशाही