कुष्ठरोग निवारणात महाराष्ट्र देशात पिछाडीवर
By Admin | Updated: September 19, 2015 22:58 IST2015-09-19T22:58:23+5:302015-09-19T22:58:23+5:30
कुष्ठरोग निवारणासाठी आरोग्य विभागामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. तपासणी व औषधोपचार केंद्रांच्या माध्यमातून कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविण्याच्या
कुष्ठरोग निवारणात महाराष्ट्र देशात पिछाडीवर
- नितीन गव्हाळे, अकोला
कुष्ठरोग निवारणासाठी आरोग्य विभागामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. तपासणी व औषधोपचार केंद्रांच्या माध्यमातून कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. तरीही कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला अपयश येत असल्याचे राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अहवालावरून दिसून येते. कुष्ठरोग निवारणामध्ये देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात गतवर्षी कुष्ठरोगाची १0 हजार ८१३ प्रकरणे आढळून आली होती. २0१५मध्ये ती संख्या ११ हजार ३७९वर पोहोचली. राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा, केरळ, कर्नाटक, आसाम या राज्यांचा विचार केला, तर रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात त्यांना यश आल्याचे दिसून येते. देशामध्ये कुष्ठरोगाचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात आहे.
कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार आहे. ग्रामीण भागामध्ये आजाराविषयी अज्ञान असल्याने, नागरिक खबरदारी घेत नाहीत. कुष्ठरोगाची बाधा झाल्यानंतरही अनेक जण उपचार घेत नाहीत. रुग्ण शोधून काढून त्यांच्यावर उपचार करावे लागतात. आदिवासीबहुल भागात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. बी.एल. माने, साहाय्यक उपसंचालक, आरोग्यसेवा कुष्ठरोग
सर्वाधिक कुष्ठरुग्ण असणारी राज्ये
राज्य२0१४२0१५
उत्तर प्रदेश१४४२८१४0९९
महाराष्ट्र१0८१३११३७९
बिहार१0१00१0३२८
प. बंगाल८२४२९0५४
कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविणारी राज्ये
राज्य२0१४२0१५
गुजरात५२८२४८५0
राजस्थान१२३७११४७
तामिळनाडू२९९३२८८८
ओडिशा६४0५५४२३
केरळ८३९७0४
कर्नाटक२८00२७२६
आसाम९६५८५८
मध्य प्रदेश५३९९५९२२
गुजरात५२८२४८५0
आंध्र प्रदेश२७५३३१२९