महाराष्ट्रावर ठळक होतोय कुष्ठरोगाचा चट्टा !
By Admin | Updated: January 25, 2015 00:57 IST2015-01-25T00:57:59+5:302015-01-25T00:57:59+5:30
‘नारूचा रोगी दाखवा अन् १ हजार रुपये बक्षीस मिळवा,’ यासोबतच पूर्वी कुष्ठरोगाबाबतची घोषवाक्ये भिंतीवर दिसत होती.

महाराष्ट्रावर ठळक होतोय कुष्ठरोगाचा चट्टा !
मिलिंदकुमार साळवे -
श्रीरामपूर (जि. अहमदनगर)
‘नारूचा रोगी दाखवा अन् १ हजार रुपये बक्षीस मिळवा,’ यासोबतच पूर्वी कुष्ठरोगाबाबतची घोषवाक्ये भिंतीवर दिसत होती. नारूचा नायनाट झाला असला तरी आता कुष्ठरोगाचा हा चट्टा पुन्हा ठळकपणे दिसू लागला आहे. त्यावर उपाययोजना सुरू असताना सरकारने यासाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या यंत्रणा मात्र गुंडाळल्या आहेत. त्यामुळे या चट्ट्याचा कायमचा नायनाट होणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
श्रीरामपूर तालुक्यात पढेगाव, माळवडगाव, टाकळीभान, उंदीरगाव, बेलापूर, निमगावखैरी या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डिसेंबर २०१४ अखेर ७९ संशयित कुष्ठरोगी आढळले राज्याचे आरोग्यसेवा सहसंचालक (कुष्ठरोग व क्षयरोग) यांना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या तालुक्याचा जास्त कुष्ठरोग दिसून आला. आशा वर्कर्स यांनी नवीन कुष्ठरुग्ण शोधल्यास २५० रुपये, तसेच उपचाराप्रमाणे ४०० ते ६०० रुपये प्रति रुग्ण मानधन दिले जाईल. ठाणे, रायगड, मुंबई, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात प्रमाण जास्त आहे. कुष्ठरोगाच्या समूळ उच्चाटनाचे अंतिम ध्येय ठेवण्यात आले आहे.
--------
गांधी जयंतीपासून शोधमोहीम
गांधी जयंतीपासून राज्यात कुष्ठरोग शोधमोहीम राबविली जाईल. त्यानुसार श्रीरामपूर शहरात २६ पथकांद्वारे शहरातील २४ अधिकृत झोपडपट्ट्यांमधील ३७,६६० लोकसंख्येपर्यंत पोचून कुष्ठरुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. त्वचारोग तज्ज्ञांकडूनही अशा रुग्णांची माहिती घेऊन जनजागृती केली जात आहे.
- संजय दुशिंग, कुष्ठरोग संदर्भसेवा केंद्र,
ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर.