कुष्ठरोग सरकारने संपविला : विकास आमटे
By Admin | Updated: March 11, 2017 22:05 IST2017-03-11T22:05:59+5:302017-03-11T22:05:59+5:30
कुष्ठरोग हा संपला असे सरकारी पातळीवर सांगितले जाते. सरकारने कुष्ठरोग निर्मूलन विभागदेखील बंद केला आहे

कुष्ठरोग सरकारने संपविला : विकास आमटे
नाशिक : कुष्ठरोग हा संपला असे सरकारी पातळीवर सांगितले जाते. सरकारने कुष्ठरोग निर्मूलन विभागदेखील बंद केला आहे; मात्र कुष्ठरोगाची समस्या गेल्या वर्षापासून पुन्हा वाढीस लागल्याची खंत महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली.
जागतिक प्लंबिंग दिनाच्या निमित्ताने इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित सोहळ्यात आमटे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्लंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद शेटे, अविनाश पाटील, विजय सानप, दिनेश क्षीरसागर, प्रदीप आबड आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमटे म्हणाले, आनंदवनाने सुमारे २६ कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे व्रत स्वीकारले आहे. आनंदवन कायमस्वरूपी बंद व्हावे, असे बाबांना नेहमी वाटत होते. बाबा आनंदवनाला जगातली सर्वांत वाईट जागा असे म्हणत असे. आज जरी सरकारी पातळीवर सरकारने कुष्ठरोग संपविला असला तरी साठ टक्के कुष्ठरोगाची समस्या कायम आहे. २०१६ पासून कुष्ठरोगाच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले असताना सरकारचे कुष्ठरोग निर्मूलन विभाग कायमस्वरूपी बंद झाले ही आश्चर्याची बाब असल्याचे आमटे यांनी सांगितले.