शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर : चामटोलीच्या जंगलात दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 17:54 IST

चंदेरीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या चामटोली गावाच्या परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्यानं चामटोलीतील शेतक-याच्या बक-यादेखील फस्त केल्या आहेत.

बदलापूर - चंदेरीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या चामटोली गावाच्या परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्यानं चामटोलीतील शेतक-याच्या बक-यादेखील फस्त केल्या आहेत. या जंगलात बिबट्या नामशेष झाले होते. मात्र आता पुन्हा बिबट्या या भागात आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच वन विभागाच्या अधिका-यांनी परिसराची पाहणी केली असता बिबट्यासोबत त्याचे दोन बछडेदेखील असल्याची स्पष्ट केले आहे. 

चंदेरीच्या पर्वत रांगेत पूर्वी वन्य जिवांचा मोठ्या प्रमाणात वावर होता. बिबटेदेखील या भागात होते. मात्र गेल्या 20 ते 25 वर्षात या भागात ग्रामस्थांना कधी बिबट्याचा वावर जाणवला नाही. मात्र गेल्या महिन्याभरापासून या भागात एक बिबट्या बक-यांची शिकार करत असल्याचे शेतक-यांच्या लक्षात आले. रानात चरण्यासाठी गेलेल्या बक-यांपैकी काही बक-यांची शिकार या बिबटय़ाने केली होती. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. चामटोली भागातील जंगलात हा बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांना जंगलात जाताना सतर्क राहण्याचे आदेश वन विभागाने दिले आहे. तर बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ मात्र चिंतेत आहेत. या भागात बिबट्या फिरत असला तरी त्याने अद्याप मानवी वस्तीत हल्ला चढवलेला नाही. या भागातील जंगलात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात असल्याने या बिबटय़ाला मुबलक शिकार मिळत आहे. मात्र रानडुक्करची शिकार करतांना या बिबट्याला बक-या दिसल्याने त्याने ही शिकार केल्याचे वन विभागाचे अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी स्पष्ट केले. या बिबट्याचा ग्रामस्थांना सध्या तरी कोणताच धोका असल्याचे दिसत नाही. मात्र ग्रामस्थांनी जंगलात जाताना दक्षता घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

चामटोली भागात बिबट्या आल्याची चर्चा असताना गुरुवारी वन विभागाच्या अधिका-यांनी चामटोली येथील ताण गावाच्या परिसरात पाहणी केली. यावेळी बिबट्याच्या पायांचे ठसेदेखील त्यांना सापडले आहेत. तर काही आदिवासीयांनी दोन बछड्यांसह या बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. तर एका शेतक-याने बिबट्या पाणी पितानादेखील पाहिले आहे. या शेतक-यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केलेला असतानाच आता वन विभागाने देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे. बिबट्या हा या जंगलात पुन्हा आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्या शेतक-यांच्या शेळळ्या ह्या बिबट्याने खाल्ले आहेत त्यांना भरपाई देण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. 

‘‘भीमाशंकरच्या जंगलातून हे बिबटे या भागात आल्याची शक्यता आहे. बछड्यांसह हा बिबटा फिरत असल्याने हे जंगल त्यांच्यासाठी सुरक्षित वाटत असेल. गावाच्या जवळच बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याचा वावर हा नैसर्गिक असल्याने ग्रामस्थांनीच काळजी घेणो गरजेचे आहे''. - चंद्रकांत शेळके, वनअधिकार.