नाशिकमध्ये बिबट्या जेरबंद
By Admin | Updated: February 19, 2016 16:40 IST2016-02-19T16:40:07+5:302016-02-19T16:40:07+5:30
अंबड येथील क्रॉम्पटन ग्रिव्हज कंपनीत आज सकाळी बिबट्या आढळून आला. सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत बिबट्याला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले

नाशिकमध्ये बिबट्या जेरबंद
>ऑनलाइन लोकमत -
नाशिक, दि. 19 - अंबड येथील क्रॉम्पटन ग्रिव्हज कंपनीत आज सकाळी बिबट्या आढळून आला. बिबट्याला पाहिल्यानंतर कामागारांची धावपळ सुरु झाली. पोलीस आणि वनविभागाला यासंबंधी कळवल्यानंतर वेळेत पोहोचत बिबट्याला जेरंबद करण्यात आले. कंपनीतच लपलेल्या या बिबट्याला पकडण्यासाठी अधिका-यांना मात्र मोठी कसरत करावी लागली. अखेर सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत बिबट्याला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. पाण्याच्या शोधात बिबट्या आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.