गुनाट येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
By Admin | Updated: September 6, 2016 01:13 IST2016-09-06T01:13:34+5:302016-09-06T01:13:34+5:30
कोळपे वस्ती-गुनाट (ता. शिरूर) या भागात गेल्या ८ दिवसांपासून दहशत माजविण्याऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास शिरूर वनविभागास अखेर यश आले.

गुनाट येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
निमोणे : कोळपे वस्ती-गुनाट (ता. शिरूर) या भागात गेल्या ८ दिवसांपासून दहशत माजविण्याऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास शिरूर वनविभागास अखेर यश आले. कोळपेवस्ती-गुनाट ( ता. शिरूर ) येथील परिसरात गेली ८ दिवसांपासून शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडत होते. परिसरातील कोंबड्या, तसेच छोट्या-मोठ्या प्राण्यांना त्याने लक्ष्य बनविले होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व विशेषत: महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या भागात राहणारे शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव कोळपे यांनी याची शिरूर वनविभागाला कल्पना दिली. त्यानुसार खात्याने खातरजमा करून या भागात पिंजरा लावला होता. तीन दिवसांपासून या भागात पिंजरा लावून वनपाल संकपाळ यांसह कर्मचारी थांबले होते. यात भक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यामुळे रविवार, दि. ३ रोजी रात्री आठच्या आसपास दोन वर्षे वयाचा मादी बिबट्या यात जेरबंद झाला. त्यानंतर सर्व सोपस्कार करून त्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात सोडण्यात आले.