गावक-यांनी काढले शाळेतील लिंबू-मिरची
By Admin | Updated: December 26, 2014 04:33 IST2014-12-26T04:33:08+5:302014-12-26T04:33:08+5:30
पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर भूतबाधा टाळण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारासह प्रत्येक खोलीला बांधलेले

गावक-यांनी काढले शाळेतील लिंबू-मिरची
एटापल्ली (जि़ गडचिरोली) : पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर भूतबाधा टाळण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारासह प्रत्येक खोलीला बांधलेले लिंबू-मिरची गुरुवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढून टाकण्यात आले.
‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त झळकताच अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या कृतीचा राज्यभरात निषेध झाला़ या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली़ त्यानंतर मुख्याध्यापक एस. डब्ल्यू. खेडेकर यांनी आश्रमशाळेत ग्रामस्थांची बैठक घेतली. तीत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूनच यापुढे कृती केली जाईल, असा निर्धार व्यक्त झाला़ बैठकीनंतर ग्रामस्थ, मुख्याध्यापक व शिक्षकांनी लिंबू-मिरची काढून टाकले. हा प्रकार अंधश्रद्धेपोटी नव्हेतर ग्रामदेवता माउली यांच्यावर श्रद्धा ठेवून करण्यात आला, असे संस्थेचे अध्यक्ष भारत राऊत यांनी सांगितले. मुख्याध्यापक खेडेकर यांनी झालेली चूक मान्य केली़