विधिमंडळाचे रेकॉर्डब्रेक कामकाज
By Admin | Updated: April 11, 2015 00:10 IST2015-04-11T00:10:11+5:302015-04-11T00:10:11+5:30
सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेकॉर्डब्रेक कामकाज झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विधिमंडळाचे रेकॉर्डब्रेक कामकाज
मुंबई : सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेकॉर्डब्रेक कामकाज झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, टोलमुक्ती, शेतक-यांचे पॅकेज, मुंबईचा विकास आदी सर्व विषयात सरकारने ठोस भूमिका घेतली आहे. गारपीट, अवकाळी पाऊसाने पिडीत शेतक-यांना सरकारने आतापर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एकूण दहा हजार कोटींची मदत दिली. ऊस उत्पादक शेतक-यांच्या एफआरपीसाठी २ हजार कोटींच्या कर्जाची घोषणा करण्यायत आली असून त्यामुळे शेतक-यांना प्रतिटन २२५ रुपये मिळणार आहेत.
शिवस्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला असून मुंबईच्या विकासासाठी मेट्रो, मोनोसह सिडकोच्या घरांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
युती सरकार सत्तेत आल्यापासून अपराधसिध्दीचे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मार्च अखेरीस हा दर ३८ टक्कयांपर्यंत पोहचले आहे. नागपूरच्या तुरुंगातून कैद्यांचे पलायन गंभीर घटना आहे. नागपूर तुरुंगात शंभरहून अधिक मोबाईल असून तुरुंगफोडीची घटना घडू शकते, असा स्पष्ट इशारा मागील सरकारला मिळाला होता. मात्र, या अहवालावर मागील सरकारने कारवाई केल्या नसल्याचा आरोपाचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. (प्रतिनिधी)