नायब तहसीलदारास आमदाराची मारहाण
By Admin | Updated: October 21, 2015 02:48 IST2015-10-21T02:48:43+5:302015-10-21T02:48:43+5:30
पांग्री उबरहंडे ग्रामस्थांच्या शिधापत्रिकांचे वाटप दोन वर्षांपासून रखडल्याने, चिखलीचे काँग्रेस आ़ राहुल बोंद्रे यांनी बुलडाण्याच्या नायब तहसीलदारांना जाब विचारत, थेट

नायब तहसीलदारास आमदाराची मारहाण
बुलडाणा : पांग्री उबरहंडे ग्रामस्थांच्या शिधापत्रिकांचे वाटप दोन वर्षांपासून रखडल्याने, चिखलीचे काँग्रेस आ़ राहुल बोंद्रे यांनी बुलडाण्याच्या नायब तहसीलदारांना जाब विचारत, थेट त्यांच्या कानशिलातच लगावल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.
आमदारांच्या या कृतीचा निषेध करत, महसूल अधिकारी-कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये बंद ठेवली. बोंद्रे, नायब तहसीलदार के.बी. सुरडकर यांच्याकडे गेले़ दोन वर्षांपासून पांग्री येथील ७० नागरिकांना शिधापत्रिका का दिल्या जात नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली़
बोंद्रे यांनी सुरडकर यांच्याकडे प्रकरणाबाबत विचारणा केली. कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नाही, ती पूर्ण करून द्या, असे सुरडकर यांनी सांगताच, बोंद्रे यांनी त्यांच्या श्रीमुखात भडकावली. (प्रतिनिधी)