शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणूक : महायुतीतच रंगतेय ‘दोस्तीत कुस्ती’; अजित पवार गटाच्या लोकप्रतिनिधींची बैठकीस दांडी

By संकेत शुक्ला | Updated: June 17, 2024 21:25 IST

शिक्षक विधानपरिषदेसाठी महायुती आणि महाआघाडी यांच्याकडून उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश पचविताना मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू असताना विधानपरिषद निवडणुकीत नाशिक विभागात राष्ट्रवादीतर्फे रिंगणात असलेल्या धुळे येथील ॲड. महेंद्र भावसार यांच्या उमेदवारीवर पदाधिकाऱ्यांनी प्रथमच शिक्कामोर्तब केल्याने युतीत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ही लढत मैत्रीपुर्ण आहे की दोस्तीत कुस्ती याबाबत गौडबंगाल कायम आहे.

शिक्षक विधानपरिषदेसाठी महायुती आणि महाआघाडी यांच्याकडून उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यातही शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यातच लढत असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षानेही धुळे येथील भावसार यांना एबी फॉर्म दिला आणि तेव्हापासून महायुतीतील उमेदवाराने बंड केल्याचे बोलले जात होते. मात्र पक्षातील एकाही स्थानिक नेत्याने प्रचारासाठी पुढाकार घेत उमेदवाराबाबत अधिकृत माहिती दिली नव्हती. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनीही त्याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे वक्तव्य केले होते.

अशातच नाशिकमध्ये महायुतीतील दोन उमेदवार रिंगणात कसे याबाबत वरिष्ठ पातळीवरही कोणतीच चर्चा होताना दिसत नसल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही गोंधळाचे वातावरण होते. हा गोंधळ दूर करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी नाशिकमध्ये येत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भावसार हे आपले अधिकृत प्रतिनिधी असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता महायुतीत सर्व काही आलबेल नसून विधानपरिषदेत राष्ट्रवादीने नाशिक विभाग मतदारसंघात बंडखोरी करून युतीच्या विरोधात उमेदवार दिल्याचे स्पष्ट झाले. यावेळी बैठकीस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, श्रेयांश भावसार, अमर पाटील, गौरव गोवर्धने, योगेश निसळ, चेतन कासव, ऋषिकेश पिंगळे, रोहित पाटील आदी उपस्थित होते.

आमदार, ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थितीनाशिकमध्ये अजित पवार गटाची ताकद मोठी आहे. जिल्हाध्यक्ष, आमदार यांसह विविध तालुक्यांमध्ये मोठ्या पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांची या बैठकीत अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. जिल्ह्यातील एकही आमदार या बैठकीस उपस्थित नव्हता. त्यामुळे पक्षाकडून अधिकृत उमेदवारी असली तरी पदाधिकारी का आले नाही अशी चर्चा रंगली होती.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024MahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना