मतदानासाठी सुटी द्या
By Admin | Updated: April 8, 2015 01:54 IST2015-04-08T01:54:22+5:302015-04-08T01:54:22+5:30
वांद्रे (पूर्व) व तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या

मतदानासाठी सुटी द्या
मुंबई : वांद्रे (पूर्व) व तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या खासगी क्षेत्रात काम करीत असलेल्या मतदारांना मतदानासाठी या दिवशी सुटी किंवा कामातून दोन तासांची सवलत द्यावी, अशी सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश व लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ अन्वये नियमातील तरतुदीनुसार कामगार आयुक्तांकडून त्याबाबत विविध आस्थापनांना कळविण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ व वांद्रे (पूर्व) मतदारसंघात पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. ११ एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानासाठी संबंधित मतदारसंघातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुटी देण्यात आली आहे. या ठिकाणी असलेले औद्योगिक उपक्रम, उत्पादक कंपन्या, कारखाने, निवासी हॉटेल, मॉल्स, रिटेलर्स आदी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी शक्यतो भरपगारी सुटी देण्यात यावी किंवा मतदानाच्या कालावधीत त्या कामगारांना किमान दोन तासांची सवलत दिली जावी, असे बजावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)