तेजस एक्सप्रेसला कणकवलीत थांबा द्या: नितेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 21:54 IST2017-05-23T21:24:54+5:302017-05-23T21:54:49+5:30
मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोवा (करमळी) दरम्यान धावणाऱ्या "तेजस एक्सप्रेसला" सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे थांबा द्यावा

तेजस एक्सप्रेसला कणकवलीत थांबा द्या: नितेश राणे
ऑनलाइन लोकमत
कणकवली(सिंधुदुर्ग), दि. 23 - मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोवा (करमळी) दरम्यान धावणाऱ्या "तेजस एक्सप्रेस"ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे थांबा द्यावा अशी मागणी एका पत्राद्वारे कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात, भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोवा करमळी दरम्यान अतिशय वेगवान वातानुकूलित सुसज्ज अशी तेजस एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर सुरु केली आहे. त्याबद्दल आपले आभार मानतो. या एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी आणि कुडाळ असे थांबे देण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्थानकावरुन कोकण रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवासी ये - जा करीत असतात. तेजस एक्सप्रेसला कणकवली रेल्वे स्थानकावर थांबा न दिल्याने सिंधुदुर्गातील कणकवली, देवगड, वैभववाडी आदी तालुक्यातील असंख्य गावातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा लाभ होणार नाही. त्यामुळे या प्रवाशांच्या सुविधेचा विचार करून कणकवली येथे या एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा,असे म्हटले आहे.