एटीएममधून काढता येणार साडेचार हजार
By Admin | Updated: December 31, 2016 08:34 IST2016-12-31T05:05:57+5:302016-12-31T08:34:52+5:30
नोटाबंदीनंतर एटीएममधून प्रतिदिन अडीच हजार रुपये काढण्याची मर्यादा वाढवून रिझर्व्ह बँकेने ती साडेचार हजारांवर नेली आहे. यामुळे दर दिवशी एका एटीएममधून साडेचार हजार

एटीएममधून काढता येणार साडेचार हजार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - नोटाबंदी निर्णयामुळे हैराण झालेल्या देशवासियांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नववर्षांचे गिफ्ट दिले आहे. नोटाबंदीनंतर एटीएममधून प्रतिदिन 2,500 हजार रुपये काढण्याची मर्यादा वाढवून रिझर्व्ह बँकेने ती 4,500 हजार रुपयांवर नेली आहे. यामुळे दर दिवशी एका एटीएममधून साडेचार हजार रुपये काढता येतील. एक जानेवारीपासून याची अंमलबजावणी केली जाईल. दर आठवड्याला चेकद्वारे बँकेतून काढण्यासाठी चोवीस हजारांची मर्यादा रिझर्व्ह बँकेने मात्र कायम ठेवली आहे.
पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, नोटाबंदी निर्णयाला आता 50 दिवस पूर्ण झाले आहेत. यानंतर नोटाटंचाईची समस्या कमी होईल, असा सरकारचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयकडून एटीएममधून रक्कम काढण्याची मुदत वाढवण्यात आल्याने सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.
500 रुपयांच्या नव्या नोटा लवकरच : जेटली
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, नोटाबंदीचे लोकांनी स्वागत केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडवणारी अथवा अराजकता निर्माण करणारी एकही घटना 50 दिवसांत कुठेही घडली नाही.
देशाच्या महसुली उत्पन्नात कररूपाने मोठी भर पडली आहे, हा नोटबंदीचा महत्त्वाचा लाभ आहे. रद्द झालेल्या चलनी नोटांचा मोठा भाग बदलला गेला आहे आणि रिझर्व बँकेजवळ नव्या नोटा आवश्यक प्रमाणात उपलब्ध आहेत. 500 रुपयांच्या नव्या नोटाही लवकरच येणार आहेत.