शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar on MLA's Behavior: अरे निदान मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी सोड; अजित पवारांनी घेतली बेशिस्त आमदारांची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 15:05 IST

Ajit Pawar on MLA's Behavior Maharashtra Assembly: आता सभागृहातील कामकाज लाईव्ह होते. तीस, पस्तीस वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना मान देत होतो. आता अध्यक्षांकडे पाठ केली जाते, अशा शब्दांत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.

या वेळचे हिवाळी अधिवेशन हे आमदारांची बेशिस्त, गंभीर आरोप आणि सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर गाजत आहे. नितेश राणे यांनी केलेले मॅव मॅव, अजित पवारांवरील राज्य विकण्याची टीका, नितेश राणे यांचे एका शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्यात आलेले नाव आदी विषय गंभीरपणे चर्चिले गेले आहे. अजित पवारांनी यावर आमदारांना शिस्तपालन करण्यासाठी शाळा घेतली.(Maharashtra Assembly Winter Session)

आता सभागृहातील कामकाज लाईव्ह होते. तीस, पस्तीस वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना मान देत होतो. आता अध्यक्षांकडे पाठ केली जाते. येताना अध्यक्षांना नमस्कार करायचा आणि बसायचे, जाताना नमस्कार करून जायचे. आता कोणीच ते नमस्कार करत नाही, आमदार झालो म्हणजे आपल्याला सारे कळते, असे अनेकजण वागू लागले आहेत, अशी टीका अजित पवारांनी केली.

आमच्या काळात मंत्र्याच्या मागे बसून त्यांच्याशी बोलायचो. आता दहा दहा मिनिटांनी आमदार पत्र द्यायला येतात, असे सांगताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीबाबत काही दिवसांपूर्वी घडलेला किस्सा सांगितला. एका आमदार हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये येऊन बसला. त्याला म्हणालो, अरे ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, निदान ती तरी सोड. तुला 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस, आजकाल कोणीही कुठेही फिरत असतो, क्रॉस करत असतो. मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील तर आम्ही क्रॉस करायचो नाही. आता आमच्या जागेवरही येऊन बसतात, अशा शब्दांत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. 

आमदारांना सभागृहाबाहेर उभे करा...सभागृहातील शिस्तीवर भाष्य करताना विधानसभा अध्यक्षांना अशा आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. अशा आमदारांना सभागृहाबाहेर चार तास उभे करण्याची शिक्षा करा, जास्तच असेल तर दिवसभर उभे करा. तरच यांना शिस्त लागेल. सभागृहाचा शिष्टाचार पाळला गेला पाहिजे.  विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते. काही सदस्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच तडा गेला आहे‌. आता सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

संबंधीत बातम्या...

Narayan Rane Angry: कोण अजित पवार? आदित्य आणि मांजराचा संबंध काय? नितेश राणेंवरील प्रश्नावर नारायण राणे भडकले

 १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात अजित पवार यांची भाजपाला साथ? म्हणाले १२-१२ महिने कुणाला बाहेर पाठवू नका

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभा