शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"किमान लस तरी मोफत द्या"; राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By जयदीप दाभोळकर | Updated: January 5, 2021 14:08 IST

दोन दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या वापरासाठी केंद्रानं दिली होती परवानगी

ठळक मुद्देमोफत लसीकरणासाठी राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्रसीरम आणि भारत बायोटेकच्या लसींच्या वापरासाठी केंद्रानं दिली आहे परवानगी

दोन दिवसांपूर्वी देशात सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या आपात्कालिन वापरास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर लवकरच देशभरात लसीकरणाचा कार्यक्रमही राबवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावरून भाजपा नेते आणि प्रवक्त राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यातील सर्व नागरिकांना करोनाची लस मोफत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं आहे."राज्यातील जनतेसाठी मोफत लस उपलब्ध करून देण्यात यावी. कोरोना पॅकेज देणार असल्याचं तुम्ही म्हटलं होतं. परंतु दिलं काहीच नाही. लोकांना कमीतकमी मोफत लस तरी द्या," असं राम कदम म्हणाले. त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. "जगभरात पसरलेल्या कोरोना महासाथीच्या संकटाचा परिणाम भारतावरही झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि विशेषत: महाराष्ट्राला याचा याचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही राज्यात अधिक आहे. राज्यातील नागरिकांना आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागत आहे," असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.  "केंद्र सरकारनं आर्थिक मदत पुरवली असूनही राज्यातील गरजूंना मदत देण्यात आलेली नाही. शेतकरी, कामगार वर्ग, छोटे दुकानदार, रिक्षा-टॅक्सी चालक यांना या काळात मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. राज्यातील खराब आरोग्य यंत्रणेमुळे अनेक गरीबांना आपले प्राण गमवावे लागले. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील नागरिकांच्या समस्यांमध्येही अधिक वाढ झाली आहे. त्यांना अद्याप कोणतीही मदत देण्यात आलेली नाही," असंही त्यांनी यात नमूद केलं आहे."भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून राज्यातील जनतेला ही लस मोफत दिली जावी अशी अपेक्षा आहे. राज्यातील जनतेला वेळेत ही लस मोफत मिळेल अशी मी आशा करतो. या आगोदर राज्य सरकार सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरलं आहे. म्हणून राज्य सरकारनं जनहितासाठी आणि निष्ठेनं जनतेची सेवा करावी. राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठी चांगले निर्णय घ्यावे अशी माझी अपेक्षा आहे," असंही कदम यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

टॅग्स :Ram Kadamराम कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस