आता विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये मिळणार लर्निंग लायसन्स
By Admin | Updated: January 11, 2017 15:53 IST2017-01-11T15:53:09+5:302017-01-11T15:53:52+5:30
दुचाकी आणि चारचारी शिकण्याची इच्छा असणा-या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता राज्यातील सर्व कॉलेजमधूनच विद्यार्थ्यांना वाहतूकीचा शिकाऊ परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) मिळणार आहे.

आता विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये मिळणार लर्निंग लायसन्स
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - दुचाकी आणि चारचारी शिकण्याची इच्छा असणा-या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता राज्यातील सर्व कॉलेजमधूनच विद्यार्थ्यांना वाहतूकीचा शिकाऊ परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) मिळणार आहे. याबाबतचा निर्णय राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी घेतला आहे.
दरम्यान, या राज्य सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना यापुढे आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. तसेच, या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 16 जानेवारीपासून करण्यात येणार असल्याचेही दिवाकर रावते यांनी सांगितले. याचबरोबर मुंबईतील किर्ती कॉलेजमधून या योजनेला सुरुवात होणार असल्याचे समजते.