शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्टेशनला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 01:43 IST

वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो मार्गावरील वर्सोवा ते अंधेरी मार्केट मार्गावरील जयप्रकाश रोड आणि अंधेरी (पूर्व) कडील अंधेरी-कुर्ला रोड या मुख्य रस्त्यांनाही बसला होता

मनोहर कुंभेजकर,

मुंबई- शुक्रवारी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो मार्गावरील वर्सोवा ते अंधेरी मार्केट मार्गावरील जयप्रकाश रोड आणि अंधेरी (पूर्व) कडील अंधेरी-कुर्ला रोड या मुख्य रस्त्यांनाही बसला होता. मेट्रो स्थानक झकास तर अंधेरी वर्सोवा मेट्रोखालील परिसर भकास अशीच अवस्था जणू मेट्रो रेल्वे स्थानकांखालील रस्त्यांची झाली होती. मेट्रोच्या छतातून अनेक ठिकाणी जमिनीवर अभिषेक होत होता. त्यामुळे आधीच खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या येथील रस्त्यांची खूपच दैनावस्था झाली होती.या मार्गावर इंडियन आॅईल स्थानकाजवळील अंधेरीकडे जाणाऱ्या जयप्रकाश रोडच्या रस्त्यावर तर अंधेरी-कुर्ला मार्गावरील एअरपोर्ट रोड या मेट्रो स्थानकानजीक मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यातच मेट्रो स्थानकांच्या छतांमधून अनेक ठिकाणी वेगाने पाण्याची गळती होऊन त्याचा फटका वाहनांना आणि दुचाकीस्वारांना जास्त बसत होता. त्यामुळे मेट्रो स्टेशनच्या खालचा परिसर जलमय झाला होता.२००६ साली वर्सोवा घाटकोपर मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात होऊन ८ जून २०१४ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या मेट्रोचा शुभारंभ झाला. मात्र मेट्रोचे काम सुरू असतानाच मुंबई मेट्रो वन इन कंपनी आणि मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जयप्रकाश रोड आणि अंधेरी-कुर्ला रोड या मुख्य रस्त्यांवरील ड्रेनेज सिस्टीमकडे आणि छतामधून खाली पाणीगळती होणार नाही, याकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे मेट्रो सुरू झाल्यापासून गेली दोन वर्षे पावसाळ्यात या दोन्ही रस्त्यांवर पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणत पाणी तुंबत असल्याचा आरोप वॉच डॉग फाउंडेशनचे ग्रॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी केला. या दोन्ही मार्गांवरील रस्त्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात चाळण झालेली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे अंधेरी-कुर्ला मार्गावर वाहतूककोंडी होत असून त्याचा फटका वाहनचालकांना बसत असल्याची माहिती त्यांनी दिली. >अधिकाऱ्यांचे दुर्लक्षमेट्रोचे काम सुरू असतानाच मुंबई मेट्रो वन इन कंपनी आणि मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जयप्रकाश रोड आणि अंधेरी-कुर्ला रोड या मुख्य रस्त्यांवरील ड्रेनेज सिस्टीमकडे तसेच छतामधून खाली पाणीगळती होणार नाही, याकडे गांभिर्याने लक्षच दिले नाही.