आघाडीचा धर्म, कुणी आम्हाला शिकवू नये
By Admin | Updated: July 26, 2014 01:39 IST2014-07-26T01:39:26+5:302014-07-26T01:39:26+5:30
आघाडीचा धर्म पाळत गेली पाच वर्षे अन्याय खपवून घेतला़ त्यामुळे आघाडीचा धर्म पाळण्याचे कुणी आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करू नये,

आघाडीचा धर्म, कुणी आम्हाला शिकवू नये
नांदेड : आघाडीचा धर्म पाळत गेली पाच वर्षे अन्याय खपवून घेतला़ त्यामुळे आघाडीचा धर्म पाळण्याचे कुणी आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगाविला़ आघाडी शासनाने राज्यात विकासाची अनेक कामे केली. परंतु केलेल्या कामांचे ‘मार्केटींग’ करण्यात आम्ही कमी पडलो़, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या येथील निर्धार मेळाव्यात तटकरे म्हणाले, आम्हाला जातीयवादी सरकार निवडून आणायचे नाही़ त्यामुळे मित्रपक्षाने आम्हाला कमकुवत, दुबळे समजू नय़े लोकसभेत जे झाले ते विधानसभेत होवू नये, याचीही कार्यकत्र्यानी पुरेपूर खबरदारी घेण्याची गरज आह़े येत्या 15 ते 17 ऑगस्टला निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आह़े
समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीला अधिक जागा मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. परंतु कार्यकत्र्यानीही मरगळ झटकून कामाला लागले पाहिज़े मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे, असेही त्यांनी ठासून सांगितल़े
जागा वाटपाचा निर्णय पवार-सोनिया गांधी घेणार
च्विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अंतिम निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
च्केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असे पवार म्हणाल़े
धनगर आरक्षणावर आज निर्णय
धनगर आरक्षण प्रश्नावर शनिवारी बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला आहे. या बैठकीत धनगर समाजाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा होईल. त्यावर निर्णय होणो अपेक्षित असल्याचे अजित पवार यांनी वसमत (जि. हिंगोली) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.