शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांना सहा जागा सोडण्याची आघाडीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 06:25 IST

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य घटकपक्षांसाठी एकूण सहा जागा सोडण्याची आघाडीची तयारी आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य घटकपक्षांसाठी एकूण सहा जागा सोडण्याची आघाडीची तयारी आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी ४२ जागा लढवणार असून उर्वरित सहा जागा घटकपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. यात स्वाभिमानी, भारिपसह माकप, रिपाइं कवाडे गट आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा समावेश असणार आहे. राजू शेट्टी यांनी हातकणंगले, माढा, वर्धा आणि बुलडाणा अशा चार जागांची मागणी केली होती. मात्र, हातकणंगलेच्या जोडीने आणखी एखादी जागा सोडण्याची आघाडीची तयारी असल्याचे समजते. तर, प्रकाश आंबेडकर यांच्याशी येत्या आठवडाभरात चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर आघाडीतील जागावाटपाबाबत अद्याप कोणताच प्रस्ताव आला नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वाटाघाटी जवळपास पूर्ण झाल्या आहेत. जागांच्या अदलाबदलीसह सर्व मुद्द्यांवर तोडगा निघाला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीत यावे अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे. मात्र, आंबेडकरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी बैठकीनंतर सांगितले. जागावाटप नक्की झाले असले तरी घटकपक्षांशी चर्चा केल्यानंतरच याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.राज ठाकरे यांच्या भेटीबाबत पक्षातील अन्य नेत्यांना अवगत केले आहे. मनसे आणि राष्ट्रवादीतील चर्चा पूर्ण झाल्यानंतर याबाबत काँग्रेसशी बोलणी करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.‘पवार लढल्यास अन्यत्रही मिळेल फायदा’शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वच नेत्यांनी केला आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे आजूबाजूच्या मतदारसंघांवर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस