आघाडीच्या वादाचा पोलिसांना फटका

By Admin | Updated: July 25, 2014 02:29 IST2014-07-25T02:29:52+5:302014-07-25T02:29:52+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून सत्ताधारी कॉँग्रेस आघाडीमध्ये कलगीतुरा रंगला असताना राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बदल्या आणि बढत्यांबाबत हेच नाटय़ सुरू आहे.

The leading cause of the police hit | आघाडीच्या वादाचा पोलिसांना फटका

आघाडीच्या वादाचा पोलिसांना फटका

जमीर काझी - मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून सत्ताधारी कॉँग्रेस आघाडीमध्ये कलगीतुरा रंगला असताना राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बदल्या आणि बढत्यांबाबत हेच नाटय़ सुरू आहे. अपर अधीक्षकापासून अपर महासंचालक दर्जार्पयतच्या सुमारे 15क् अधिका:यांच्या निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बदल्या करणो अपरिहार्य आहे. मात्र कोणाला कोठे पोस्टिंग द्यायची, याबाबत दोन्ही कॉँग्रेस आग्रही असल्याने बदल्यांची फाईल महिन्याभरापासून गृह विभाग व मुख्यमंत्र्यांकडे फिरत राहिली आहे.
पदोन्नती रेंगाळल्याने संबंधित आयपीएस अधिका:यांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे. 2 एडीजी, 8 आयजीचे व 4 डीआयजी पदावरील प्रमोशन होणो अपेक्षित आहे. त्यांच्यासह अप्पर अधीक्षक ते उपायुक्तार्पयतचे एकूण 12क् आणि  अपर आयुक्त ते अपर महासंचालकार्पयतच्या 3क् अधिका:यांच्या बदल्या अपेक्षित असल्याचे गृह विभागातील  वरिष्ठ अधिका:यांकडून सांगण्यात आले.
एका पदावर सलग दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिका:यांची सार्वत्रिक बदल्यांच्या निकषाप्रमाणो बदली होणो अपेक्षित आहे.  निवडणूक आयोगाने डिसेंबर 2क्14र्पयत ज्या अधिका:यांच्या एका कार्यक्षेत्रमध्ये सलगपणो तीन वर्षे सेवा होत असल्यास त्यांच्या अन्यत्र बदल्या करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार राज्यभरातील 12क् अपर अधीक्षक, अधीक्षक व उपायुक्त बदलीसाठी पात्र ठरले आहेत. तर त्यावरील दर्जाच्या 3क् अधिका:यांचा समावेश बदल्यांच्या यादीत करण्यात आला आहे.
 
निवडणूक आयोगाने तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण केलेल्या अधिका:यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. आता राज्यातील अशा अधिका:यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन वर्षे पूर्ण केलेल्या आणि मूळ (गाव असलेल्या) जिल्ह्यात नोकरीवर असलेल्या अधिका:यांच्या बदल्यांचे आदेश लवकरच काढण्यात येतील, असे आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.  
 
कार्यकारी नियुक्तीवरील अधिका:यांचा समावेश नाही : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणो आयुक्तालयातील तीन उपायुक्त आणि सहा ते सात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. जे अधिकारी कार्यकारी नियुक्तीवर नाहीत, त्यांचा या बदल्यांमध्ये समावेश नाही, अशी माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली.
 
यांच्या मार्गात निर्माण झाला अडथळा : बदल्यामध्ये प्रामुख्याने तुरुंग विभागाच्या प्रमुख मीरा बोरवणकर, नाशिकचे आयुक्त के.के. सारंगल, पोलीस मुख्यालयातील आयजी अर्चना त्यागी, देवेन भारती, मुंबईतील दक्षिण प्रादेक्षिक विभागाचे अप्पर आयुक्त कृष्ण प्रकाश, विजय चव्हाण, उपायुक्त  रवींद्र शिसवे, शारदा राऊत, निसार तांबोळी, विनायक देशमुख, धनंजय कुलकर्णी, महेशा घुर्गे, एन.डी. चव्हाण, संजय शिंत्रे, ठाण्यातील डी.एम. फडतरे, अशोक दुधे, एम.के. भोसले, बी.बी. पाटील, पुण्यातील अप्पर आयुक्त एस.एस. साळुंखे, अब्दुल रहिमान, सी.जी. दैठणकर, नवी मुंबईतील श्रीकांत पाठक, अशोक मोराळे, विजय पाटील, एफ.के. पाटील आदींचा समावेश असल्याचे खात्रीशीर सूत्रंकडून समजते. यापैकी काही अधिका:यांनी मोक्याच्या ठिकाणच्या पोस्टिंगसाठी नेत्यांमार्फत ‘फिल्डिंग’ लावली आहे.

 

Web Title: The leading cause of the police hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.