जागावाटपावरून आघाडीत तणातणी
By Admin | Updated: July 25, 2014 03:02 IST2014-07-25T03:02:45+5:302014-07-25T03:02:45+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीमध्ये 144 जागांची केलेली मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्टपणो फेटाळून लावली आहे.

जागावाटपावरून आघाडीत तणातणी
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीमध्ये 144 जागांची केलेली मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्टपणो फेटाळून लावली आहे. ‘अशी आडमुठेपणाची भूमिका मान्य करता येणार नाही,’ असे काँग्रेसच्या नेत्यांनी समन्वय समितीच्या बैठकीत ठणकावून सांगितले.
जागावाटपाबाबत काँग्रेसने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे राष्ट्रवादी सावध पवित्र्यात असून, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत शनिवारी प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात झाली. या बैठकीत जागावाटपावरून बरीच खडाखडी झाली. बैठकीला मुख्यमंत्री चव्हाण, अ.भा. काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.
राष्ट्रवादीची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाढली, लोकसभेत आम्हाला चार तर काँग्रेसला दोनच जागा मिळाल्या. आता आम्हाला विधानसभेत 144 जागा हव्या आहेत, त्यापेक्षा एकही कमी जागा मान्य केली जाणार नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. यावर, ताकद वाढली म्हणजे नेमके काय झाले? असे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी बैठकीत ठणकावून विचारले व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना साथ दिल्याचे सूत्रंनी सांगितले.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये 12 जागांची अदलाबदल करण्याची तयारी काँग्रेसच्या नेत्यांनी कालच्या बैठकीत दर्शविली. काँग्रेसचे सहयोगी असलेले 8 तर राष्ट्रवादीचे सहयोगी असलेले 1क् अपक्ष आमदार आहेत. त्यांना उमेदवारी देण्याबाबतही निर्णय समन्वय समितीत व्हावा, अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडल्याचीही माहिती आहे.
..तरच आघाडी होईल
सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी होईल़ पक्षाच्या आत्मसन्मानाशी तडजोड करून आघाडी होणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ठणकावून सांगितले. पुणो येथे झालेल्या काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात ते
बोलत होते.
288 ची तयारी आहे
राष्ट्रवादीने 144 जागांची मागणी केली आह़े ताकद वाढल्याचे ते सांगत आहेत. मात्र, मागील लोकसभेच्या वेळी कॉँग्रेसने 26पैकी 17 जागा जिंकल्या होत्या़
त्यांची मागणी आम्ही कदापिही मान्य करणार नाही़ 288 जागांवर लढण्याची आमची तयारी आहे, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
आठ दिवसांत निर्णय घ्या
जागावाटपाचा फॉम्यरुला 8 दिवसांत ठरवा, आम्हाला 144 जागाच हव्या आहेत असे कालच्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. उमेदवार निश्चितीच्या दृष्टीने आधी फॉम्यरुला ठरणो आवश्यक आहे. आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवू, असेही ते म्हणाले.
जागांचा तिढा आपल्या पातळीवर सुटणार नसेल तर लोकसभेप्रमाणो जागावाटपाचा फॉम्यरुला दिल्लीत ठरवावा, असेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुचवून पाहिले; पण काँग्रेस नेत्यांनी आधी राज्यातच चर्चा झाली पाहिजे, असा आग्रह धरल्याची माहिती आहे.
बळजबरीने कोणी उपवास सोडायला लावत असेल तर हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील घटनेचा निषेध केला़