विदर्भातील चार जिल्ह्यांत पट्टेदार वाघांचे अस्तित्व
By Admin | Updated: June 6, 2015 01:37 IST2015-06-06T01:37:45+5:302015-06-06T01:37:45+5:30
जंगलात वास्तव्यास असल्याने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी वनविभागाने कृती आराखडा तयार करण्याचे ठरविले आहे.

विदर्भातील चार जिल्ह्यांत पट्टेदार वाघांचे अस्तित्व
अमरावती : राज्यात वाघोबांची संख्या वाढतेय, ही सुखद घटना आहे. परंतु हे वाघ अतिसंरक्षित क्षेत्राबाहेर म्हणजे जंगलात वास्तव्यास असल्याने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी वनविभागाने कृती आराखडा तयार करण्याचे ठरविले आहे. चार जिल्'ांत जंगलात पट्टेदार वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांनी मुख्य वनसंरक्षकांना पाठविलेल्या पत्रात नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी, कळमेश्वर, अमरावतीचे पोहरा-मालखेड, जळगाव जिल्'ातील मुक्ताईनगर तसेच धुळे येथील शिरपूर या राखीव जंगलात पट्टेदार वाघांचे अस्तित्व असल्याचे म्हटले आहे. वाघांचे संरक्षण आणि संगोपन व्याघ्र प्रकल्पात होणे अपेक्षित आहे. मात्र, या जिल्ह्यांतील जंगलात वाघ आढळल्याच्या नोंदी वनविभागात केल्या आहेत. जंगलात पट्टेदार वाघ असणाऱ्या परिसरात गस्त वाढविणे, ट्रॅप कॅमेरे बसविणे, रेस्क्यू आॅपरेशनची चमू तैनात ठेवणे आदी उपाययोजना करण्याचे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
वाघोबांचा नवीन क्षेत्रात घरोबा
च्व्याघ्र प्रकल्पांच्या अतिसंरक्षित क्षेत्रात वाघांचे संगोपन आणि संरक्षण होणे आवश्यक आहे. परंतु काही वर्षांपासून वाघांनी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वास्तव्याचे क्षेत्र शोधून काढले आहे.
च्अतिसंरक्षित क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या वाघोबांनी ५० ते ६० कि.मी.चा प्रवास करुन खुल्या जंगलात नवीन घरोबा तयार केल्याने वनविभागाची जबाबदारी वाढली आहे.
च्अधिक जबाबदारी आली आहे. नागपूर येथे ताडोबा, पेंच, अमरावतीत बोर, नागझिरा तर जळगाव येथे मेळघाट, धुळे येथे नाशिक या भागातून पट्टेदार वाघ आल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
पोहरा- मालखेड या जंगलात यापूर्वी पट्टेदार वाघ आढळल्याची नोंद आहे. हा वाघ वर्धा जिल्ह्यातील बोर, नागझिरा येथून आल्याचा अंदाज आहे. वाघांचे मॉनिटरिंग करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. परंतु काही दिवसांपासून ट्रॅप कॅमेऱ्यात या वाघाचे लोकेशन मिळाले नाही. तरीदेखील अधिकारी, कर्मचारी पट्टेदार वाघांच्या संरक्षणासाठी तैनात आहेत.
- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती.
अशी करा उपाययोजना
राखीव व खुल्या जंगलात पट्टेदार वाघ असल्याबाबत वनविभागाने शिक्कामोर्तब केला असला तरी या वाघांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यात वाघांचे दैनंदिन मॉनिटरिंग वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद, नियमित गस्त, कॅमेरा ट्रॅपिंग, जनजागृती, शिकार प्रतिबंधक पथकाची नियुक्ती, वाघांची शिकार व दुर्घटनेवर लक्ष आदी उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. या वाघांच्या उपाययोजनांसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिल्या आहेत.