विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात!
By Admin | Updated: July 1, 2015 02:05 IST2015-07-01T02:05:02+5:302015-07-01T02:05:02+5:30
मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यात अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी राधाकृष्ण विखे पाटील जात आहेत. विरोधीपक्षनेते जर असे मुख्यमंत्र्यांसोबत

विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात!
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यात अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी राधाकृष्ण विखे पाटील जात आहेत. विरोधीपक्षनेते जर असे मुख्यमंत्र्यांसोबत परदेश दौऱ्यावर जात असतील तर ते शासनाच्या विरोधात बोलणार कधी? असा प्रश्न काँग्रेसचेच आमदार विचारत आहेत.
प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या समक्ष पत्रकार परिषदेत विखे पाटील यांना हाच प्रश्न विचारण्यात आला. ५० वर्षात कधीही विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कधी गेल्याचे उदाहरण नाही. अशोक चव्हाण देखील मुख्यमंत्री असताना त्यांनीही कधी विरोधी पक्षनेत्यांना सोबत दौऱ्यावर नेले नाही असा सवाल केला असता अशोक चव्हाण यांनी उत्तरासाठी माईक विखे पाटील यांच्याकडे सरकवला. विखे म्हणाले, बृहन्महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण आले आहे. त्यासाठी उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते म्हणून मला समारोपाला बोलावले आहे. त्यासाठी मी तेथे जाणार असून, उर्वरित दौऱ्याशी आपला संबंध नाही. मात्र आपण सरकारच्या पैशाने जात आहात असे विचारले असता विखे यांनी जर कोणाला आक्षेप वाटत असेल तर मी माझ्या खर्चाने जाईन असे सांगितले. (प्रतिनिधी)