शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

सरकारच्या षडयंत्राचा सभागृहात भांडाफोड केल्यानंच मला नोटीस, पण चौकशीला जाणार : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 13:29 IST

सायबर सेलकडून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना रविवारी चौकशीसाठीही बोलावण्यात आलं आहे.

"मार्च २०२१ मध्ये भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत मी महाविकास आघाडीच्या गृहमंत्रालयातील बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला होता. त्याची सर्व माहिती माझ्याकडे असल्याचंही सांगितलं होतं. ते गृह सचिवांना देतोय हेदेखील सांगितलं होतं. त्याच दिवशी मी ही माहिती देशाच्या गृहसचिवांना दिली. त्याचं गांभीर्य ओळखून न्यायालयानं यासंदर्भातील तपास सीबीआयला दिलाय. या प्रकरणाचा तपास सीबीआय करतंय. अनिल देशमुखांचीही चौकशी त्यात आहे," अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, आता सायबर सेलकडून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना रविवारी चौकशीसाठीही बोलावण्यात आलं आहे.

"जेव्हा ही माहिती सीबीआयकडे गेली तेव्हा राज्य सरकारनं हा घोटाळा दाबण्यासाठी एक एफआयआर दाखल केला. ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टमधील माहिती लीक कशी झाली असा एफआयआर आहे. यासंदर्भात मला पोलिसांकडून प्रश्न विचारले. यासंदर्भातील माहिती मी त्यांना देईन असं सांगितलं. मी विरोधीपक्ष नेता असल्यानं माझी माहिती कुठून आली हा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. त्यानंतर पुन्हा ते पाठवलं आणि न्यायालयातही ते सांगण्यात आलं. मला काल पोलिसांनी नोटीस पाठवली आणि मला उद्या ११ वाजता सायबर पोलीस स्थानकात बोलावलंय. मी त्या ठिकाणी जाणार आणि पोलिसांच्या चौकशीला योग्य उत्तरही देणारे. मी राज्याच्या गृहमंत्री राहिलो आहे. पोलिसांना मी सहकार्य करणार," असंही फडणवीस म्हणाले. 

माझ्याकडे ही माहिती कशी आली यापेक्षा हा अहवाल राज्याकडे सहा महिने पडलाय. त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला यावर पाचारण करावं याच्यावर पाचारण केलं पाहिजे असा सवाल फडणवीस यांनी केला. 

उद्या उपस्थित राहणार"न्यायालयानं ही माहिती सीबीआयला दिली. न्यायालयाच्या निर्णयामुळे अधिकृत माहिती, पेनड्राईव्ह, ट्रान्सस्क्रिप्ट राज्याला सीबीआयला सोपवाव्या लागल्यात, त्यामुळे या केसमध्ये अर्थ उरत नाही. सध्या राज्याची जी परिस्थिती आहे आणि परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड केलाय त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसांतील काही अधिकाऱ्यांना त्याचं उत्तर सूचत नसल्यानं मला ही नोटीस देण्यात आली आहे. मी उद्या पोलीस स्टेशनला नक्की उपस्थित राहणार," असंही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी आपल्याला पुणे पोलिसांनी कोणतीही नोटीस दिली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

खंत व्यक्त करतो१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत बॉम्बस्फोट झाला होता. त्याचे घाव आजही आपल्या मनात आहेत. यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. बॉम्ब स्फोटाच्या आरोपींशी व्यवहार करणारे, तुरुंगात जाऊनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहेत, त्याबद्दल मी खंत व्यक्त करत आहे, ्असंही ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्र