शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उद्धव ठाकरेंनी टक्केवारी बंद केली, म्हणून...; अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 16:44 IST

सत्तेचा दुरुपयोग आणि सूडाची भावना यातून ईडीची धाड टाकली जातेय. ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक धाडी टाकल्या जातायेत हे जनतेला कळतेय, सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती या धाडीतून दिसते असं दानवे म्हणाले.

मुंबई - उद्धव ठाकरेंनी टक्केवारी बंद केली म्हणूनच हे सगळे बंड घडले, जे गेलेत ते बदल्यांमध्ये कसे घेतात? काम कशारितीने विकतात? नुसता धिंगाणा सुरू आहे. मंत्रालयात जाऊन बघा काम कुणाला मिळते, काम कसे होते. हे सगळे बाहेर येईल. आम्ही सोडणार नाही. टक्केवारी तुमची बंद केली, धंदे बंद केले हे सहन न झाल्याने तुम्ही निघून गेला हे लोकांना दिसते अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला. 

अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी ठरवले असते तर हे बंड सहजपणे मोडून काढले असते. त्यांच्यासाठी फार काही अवघड नव्हते. परंतु ज्याच्या मनात गद्दारी रुजली आहे त्याला माझ्यासोबत का ठेवायचे असं ते म्हणत होते. ज्यावेळी बंड झाले तेव्हा तिथे गेलेले अनेक लोक उद्धव ठाकरेंसोबत होते, ते मुख्यमंत्री होते त्यामुळे ठरवले असते तर काहीही केले असते. यांना जाऊन द्यायचे नसते तर महाराष्ट्राची सीमा ओलांडून दिली नसती. पण सत्ता वाचवण्यासाठी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी यांच्यासारखे काम केले नाही. त्यांनी गद्दारी केली, भाजपाने फोडाफोडी केली, हे सत्तेसाठीच गेले होते असं त्यांनी सांगितले. 

तसेच सत्तेचा दुरुपयोग आणि सूडाची भावना यातून ईडीची धाड टाकली जातेय. ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक धाडी टाकल्या जातायेत हे जनतेला कळतेय, सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती या धाडीतून दिसते. काहीजण शिंदे गटात गेलेत त्यांच्याशी चौकशी व्हायला हवी. सगळ्यांना न्याय सारखा असावा. कोविड काळात देशपातळीवर जे काही घडले त्याचीही चौकशी व्हावी, तो काळ असा होता ज्या काळात २ पैसे जास्त की २ पैसे कमी पाहण्याचा वेळ नव्हता. मुंबईची चौकशी का, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर सगळीकडे चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही अंबादास दानवेंनी केली. 

दरम्यान,  ठाण्यात किती खरेदी केली अद्यापही काही सामानाचा वापर केला नाही. ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही. मुंबई महापालिका ही देशातील महत्त्वाची महापालिका आहे. ही पुढे नेण्याचे काम शिवसेनेने केले आहे. शहराच्या विकासासाठी केवळ काम करत नाही तर कोट्यवधीचे फिक्स डिपॉझिटही केले. परंतु गेल्या काळात महापालिकेत लुटालूट सुरू आहे. जी-२० च्या नावाखाली उधळपट्टी झाली आहे. त्याविरोधातच १ जुलैला मोर्चा होणार आहे असं दानवेंनी म्हटलं. 

शिंदेंचे मानसिक संतुलन बिघडलंय बंड फसले असते तर एकनाथ शिंदे यांनी स्वत:ला गोळ्या घातल्या असत्या असं दीपक केसरकर म्हणतात. हे खरे असेल तर मानसिक संतुलन कुणाचे बिघडले हे दिसते. मानसिक संतुलन एकनाथ शिंदेंचे बिघडले आहे. ही गद्दारी भाजपाच्या तालावर, ईडीच्या भीतीने भ्रष्टाचार लपवण्यासाठी केली, शिवसेनेचे बोट धरून भाजपा महाराष्ट्रात फोफावली, तीच शिवसेना फोडण्याचे पाप भाजपाने केले असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.  

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा