दोन दिवसांत दीड कोटी रुपयांची एलबीटी वसुली
By Admin | Updated: February 13, 2015 02:14 IST2015-02-13T02:14:44+5:302015-02-13T02:14:44+5:30
ज्या बांधकाम व्यावसायिकांंनी एलबीटी भरलेला नाही, अशा १७४ बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने एलबीटी

दोन दिवसांत दीड कोटी रुपयांची एलबीटी वसुली
ठाणे : ज्या बांधकाम व्यावसायिकांंनी एलबीटी भरलेला नाही, अशा १७४ बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने एलबीटी भरण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर, एलबीटीमुळे आपले बांधकाम थांबू नये, या भीतीने यातील १७ बांधकाम व्यावसायिकांनी दोन दिवसांत दीड कोटीच्या एलबीटीचा भरणा केल्याची माहिती पालिकेने दिली.
एलबीटीचे उत्पन्न वाढविण्याबाबत २९ जानेवारीला पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी ज्या बांधकाम व्यावसायिकांनी एलबीटी भरला नाही अथवा अंशत: भरला आहे, अशा बांधकाम व्यावसायिकांनी एलबीटी भरल्याची खात्री करून घेतल्याशिवाय काम सुरू करण्याचा दाखला, काम पूर्ण झाल्याचा दाखला, प्लिंथ दाखला अथवा अन्य कोणत्याही परवानग्या देऊ नयेत, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार, शहरातील १७४ बांधकाम व्यावसायिकांना शहर विकास विभागाने नोटीस बजावून एलबीटी भरण्यास सांगितले होते. (प्रतिनिधी)