एलबीटी जाणार, व्हॅट वाढणार!
By Admin | Updated: March 19, 2015 01:39 IST2015-03-19T01:39:01+5:302015-03-19T01:39:01+5:30
एलबीटीमुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्यासाठी मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढविण्याचे सूतोवाच करून सर्वसामान्य जनतेवर आर्थिक भार टाकला आहे.

एलबीटी जाणार, व्हॅट वाढणार!
करभारसंकल्प : ३७५७ कोटींचा महसुली तुटीचा अर्थसंकल्प; शेती, सिंचनासाठी अपुरी तरतूद; वह्या स्वस्त, मद्य महाग
मुंबई - वादग्रस्त ठरलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) १ आॅगस्टपासून रद्द करण्याची घोषणा करून व्यापारी वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात केला असला, तरी एलबीटीमुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्यासाठी मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढविण्याचे सूतोवाच करून सर्वसामान्य जनतेवर आर्थिक भार टाकला आहे. राज्यावर ३ लाख कोटींच्या कर्जाचा बोजा असताना ५४ हजार ९९९ कोटींचा अर्थसंकल्प सादर करून ३,७५७ कोटी रुपये महसुली तूट वाढविली आहे. अनावश्यक खर्चात बचत करून महसूल वसुली अधिक प्रभावीपणे करत
तूट भरून काढण्याचा दावा त्यांनी
केला आहे. मात्र ही तूट वर्षाच्या शेवटी पाच हजार कोटींच्या घरात जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला. निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची कितपत पूर्तता केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र त्यादृष्टीने निराशाच झाली. दिवंगत नेत्यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या योजना, सिंचनासाठी ७२७२ कोटींची तरतूद, जलयुक्त शिवार अभियानासाठी १ हजार कोटी, संसद दत्तक ग्राम (पान ७ वर)
(पान १ वरून) योजनेच्या धर्तीवर आमदार आदर्श गाव योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि मेक इन महाराष्ट्र ही या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्टे आहेत.
सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात १,९८,२३० कोटी रुपये महसूली जमा असून २,०१,९८८ कोटी रुपये महसूली खर्च आहे.
महिलांसाठी वापरण्यांत येणाऱ्या हॅन्डबँग व पर्सेस वरील कराचा दर १२.५ टक्के वरुन ५ टक्के करण्यात आला असून विद्यार्थ्यांसाठी वर्कबुक, आलेख वही, चित्रकला वही, प्रयोगशाळा वही करमुक्त केली गेली. एल. इ. डी. बल्ब वरील कर दर १२.५ टक्के वरुन ५ टक्के, वैद्यकीय उपचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या गाईड वायरवरील कराचा दर १२.५ टक्के वरुन ५ टक्के करण्यात आला आहे. कर्करोगावरील काही औषधे पूर्णपणे करमुक्त झाली आहेत. एक महिन्यापर्यत व्हॅट विवरणाच्या विलंबाकरिताचे विलंब शुल्क रु. २००० वरुन रु. १००० करण्यात आले आहे तर जीवनावश्यक वस्तुवरील कर सवलतीला आणखी एक वर्ष मुदतवाढ दिली गेली आहे. यापुढे महाराष्ट्रात सेवाकरात विक्रीकर लावता येणार नाही.
देशी मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मुल्याच्या २०० टक्के अथवा रु. १२० प्रति प्रुफ लिटर यापैकी जो जास्त असेल तो राहणार आहे. अतिरिक्त चटईक्षेत्राच्या अधिमुल्याच्या वाढीद्वारा अधिक महसुल प्राप्त केला जाईल असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले. लाँग स्टीलच्या आयातीवर प्रवेश कर लावण्यात येणार असून प्लेन आणि प्रीलॅमिनेटेड पार्टीकल बोर्ड वरील कर ५ टक्के वरुन १२.५ टक्के करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)
अर्थसंकल्पात भाजपाला जाहीरनाम्याचा विसर
समृद्ध महाराष्ट्राची हमी देणारे ‘दृष्टीपत्र’ मांडणाऱ्या भाजपाला मात्र आपल्याच जाहीरनाम्याचा विसर पडल्याचे अर्थसंकल्पातून दिसते. पोलीस जवानांच्या कल्याणासाठी आश्वासने, शेतकऱ्यांसाठी अन्नदाता आधार पेन्शन, पत्रकारांसाठी दरमहा १५०० रुपयांची पेन्शन, साठ वर्षे वयावरील पण नोकरी वा व्यवसाय न केलेल्या महिलांसाठी ‘माहेरचा आधार’ मासिक पेन्शन अशा योजनांची हमी भाजपाने दिली होती पण त्यासाठी तरतूद अर्थसंकल्पात नाही.
महापालिकांना ६८७५ कोटींची भरपाई ‘व्हॅट’द्वारे
१ आॅगस्टपासून एलबीटी रद्द केल्याने मुंबई व्यतिरिक्त महापालिकांना नुकसानभरपाईपोटी ६८७५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ही भरपाई मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढवून करण्याची घोषणाही मुनगंटीवार यांनी केली.
वर्कबुक, आलेख वही, प्रयोगशाळा वही स्वस्त
सध्या पुस्तके करमाफ असून, वह्या, आलेख वही, प्रयोगशाळा वही व आराखा वहीवर पाच टक्के कर लागतो. परंतु, वर्कबुकमध्ये वाचण्यासाठीचा मजकूर देखील असतो व लिहिण्यासाठी मोकळी जागा देखील असते. वर्कबुक पुस्तक आहे की वही आहे की इतर कोणती वस्तू आहे असा वाद आहे व यावर किती कर लागेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे वर्कबुक
१ एप्रिल २०१५ पासून करमुक्त करण्यात येईल. वर्कबुक प्रमाणेच आराखडा किंवा चित्रकला वही, प्रयोगशाळा वही, आलेख वही
करमुक्त करण्यात आले.
अतिशय बिकट अवस्थेतील अर्थव्यवस्था हाती असताना शेतकरी, ग्रामीण जनता, महिला यांच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प मांडला आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईकरांवर
दुहेरी डल्ला
एलबीटी रद्द करण्याची घोषणा ही बृहन्मुंबईतील दीड कोटी ग्राहकांच्या खिशावर दुहेरी डल्ला मारणारी ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयाने मुंबईकरांवर जकात व वाढीव ‘व्हॅट’चा बोजा पडणार आहे.
स्वस्त
च्महिलांच्या हँडबॅग व पर्सेस
च्विद्यार्थ्यांसाठी वर्कबुक, आलेख वही, चित्रकला वही, प्रयोगशाळा वही
च्एलईडी बल्ब
च्हृदयरुग्णांसाठी गाइड वायर
च्कर्करोगावरील काही औषधे
महागणार
च्देशी मद्य
च्पक्की घरे
च्लोखंड
च्पार्टीकल बोर्ड
१ आॅगस्ट २०१५ पासून स्थानिक संस्था कर रद्द करणार. मूल्यवर्धित कराच्या दरात वाढ करून महसुलाची भरपाई करणार.
महिलांसाठी १० हजार रुपये मासिक वेतनापर्यंत व्यवसाय कर माफ
महिलांच्या हँडबॅग व पर्सेसवरील कर १२.५ टक्क्यांवरून ५ टक्के
विद्यार्थ्यांसाठी वर्कबुक, आलेख वही, चित्रकला वही, प्रयोगशाळा वही करमुक्त.
एलईडी बल्बवरील कर १२.५ टक्क्यांवरून ५ टक्के
कर्करोगावरील काही औषधे करमुक्त
एक महिन्यापर्यंत व्हॅट विवरणाच्या विलंबाकरता विलंब शुल्क दोन हजारांवरून एक हजार रुपये
30000
कोटी शालेय
शिक्षणासाठी
2000
कोटी नॅशनल हायवेसाठी
200
कोटी ‘माझी कन्या, भाग्यश्री योजनेसाठी
125
कोटी नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, नाशिक बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी
100
कोटी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी