एलबीटी रद्द होणारच, उद्योजकांमध्ये उत्साह
By Admin | Updated: November 24, 2014 01:19 IST2014-11-24T01:19:56+5:302014-11-24T01:19:56+5:30
जीएसटी लागू झाल्यानंतरच एलबीटी रद्द होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांआधी प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर होता.

एलबीटी रद्द होणारच, उद्योजकांमध्ये उत्साह
नितीन गडकरींचे वक्तव्य : आजपासून ३० दिवस
नागपूर : जीएसटी लागू झाल्यानंतरच एलबीटी रद्द होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांआधी प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर होता. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिटणवीस सेंटरमधील एका कार्यक्रमात एलबीटी एक महिन्यातच रद्द करू, असे वक्तव्य केल्यानंतर उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण असून २३ डिसेंबरपर्यंत एलबीटी रद्द होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
एलबीटी रद्द करणारच, असे वक्तव्य खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केल्यानंतर उद्योजक आनंदी होते. एलबीटीला कोणता पर्याय असावा, यावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. एलबीटी रद्द व्हावा, ही सरकारची आणि पक्षाची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. व्यापाऱ्यांच्या आनंदात रविवारी नितीन गडकरी यांनी भर टाकली आहे. याआधीही एलबीटी रद्द करण्यासाठी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्त्वात संपूर्ण विदर्भात आंदोलने झाली. आघाडी सरकारने एलबीटीऐवजी दुसरा पर्याय राहील, असे आश्वासनही दिले होते. (प्रतिनिधी)