लक्ष्मीनारायण पोलीस मुख्यालयात

By Admin | Updated: January 13, 2016 01:52 IST2016-01-13T01:52:19+5:302016-01-13T01:52:19+5:30

ठाण्यातील अवैध धंदे व गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले अप्पर पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण यांची राज्य पोलीस मुख्यालयात प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे.

Laxminarayan Police Headquarters | लक्ष्मीनारायण पोलीस मुख्यालयात

लक्ष्मीनारायण पोलीस मुख्यालयात

- आशुतोष डुंबरे ठाण्याचे नवे सहआयुक्त

मुंबई : ठाण्यातील अवैध धंदे व गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले अप्पर पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण यांची राज्य पोलीस मुख्यालयात प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे. मुख्यालयातील विशेष महानिरीक्षक (अस्थापना) आशुतोष डुंबरे यांना ठाण्याचे सहआयुक्तपद सोपविण्यात आले आहे. गृह विभागाने मंगळवारी रात्री त्याबाबतचे आदेश जारी केले. ३१ डिसेंबरला वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढती करण्यात आली होती. आता पदोन्नती मिळालेल्या मुंबई पोलीस दलातील गुन्हे विभागाचे प्रमुख अतुलचंद्र
कुलकर्णी यांची कोठे नियुक्ती होते, याबाबत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांत उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Laxminarayan Police Headquarters