मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख
By Admin | Updated: July 30, 2014 01:43 IST2014-07-30T01:43:05+5:302014-07-30T01:43:05+5:30
36व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली.

मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख
औरंगाबाद : 36व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली.
मराठवाडा साहित्य परिषद कार्यकारिणीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे संमेलन डिसेंबर 2क्14मध्ये उदगीर येथे होणार असून, त्याच्या तारखा संमेलनाचे स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके लवकरच घोषित करतील, असे प्राचार्य ठाले म्हणाल़े
याप्रसंगी परिषदेचे कार्यवाह कुंडलिक अतकरे, कोषाध्यक्ष देवीदास कुलकणी हजर होते.