त्याच्या घरात उमटली ‘लक्ष्मीची पावले’ !

By Admin | Updated: November 1, 2016 03:25 IST2016-11-01T03:25:57+5:302016-11-01T03:25:57+5:30

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर एका ऊसतोड मजूर दाम्पत्याच्या जीवनात तीन कन्यांच्या रुपाने लक्ष्मीची पावले उमटली.

Laxmi steps up in his house! | त्याच्या घरात उमटली ‘लक्ष्मीची पावले’ !

त्याच्या घरात उमटली ‘लक्ष्मीची पावले’ !

संजय तिपाले,

बीड- लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर एका ऊसतोड मजूर दाम्पत्याच्या जीवनात तीन कन्यांच्या रुपाने लक्ष्मीची पावले उमटली. पहिल्या मुलीनंतर तिळे झाल्याने ‘तो’ आता चार मुलींचा बाप झालाय. ‘‘आता माझी जबाबदारी वाढली आहे, परिस्थितीची चिंता न करता अहोरात्र काबाडकष्ट करून चारही मुलींना मी शिकून मोठे करणार आहे,’’ असे अंकुश राठोड सांगत होता. ‘वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा’ ही धारणा आता बदलत चालली आहे, याचे रोठोड दाम्पत्य मूर्तीमंत उदाहरण आहे.

Web Title: Laxmi steps up in his house!