लक्ष्मणराव ढोबळेंच्या सुनेच्या गाडीतून 30 तोळे सोन्याची चोरी
By Admin | Updated: September 24, 2016 20:20 IST2016-09-24T20:20:41+5:302016-09-24T20:20:41+5:30
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सुनेचे दागिने लंपास करण्यात आले आहे

लक्ष्मणराव ढोबळेंच्या सुनेच्या गाडीतून 30 तोळे सोन्याची चोरी
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सुनेचे दागिने लंपास करण्यात आले आहे. तब्बल 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यात आल्याचं समोर आलं आहे. मॉलसमोर गाडी पार्क केली असताना ही चोरी झाली. पुण्यातील कॅम्प परिसरात ही घटना घडली.
ढोबळे यांची सून एसजीएस मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होता. मॉलसमोर त्यांनी गाडी पार्क केली. मात्र त्या पर्स गाडीतच विसरल्या. चोरट्याने संधी साधत पर्स लांबवली आणि पर्समधून 30 तोळे सोनं, पॅन कार्ड आधार कार्ड आणि गॉगल या वस्तू चोरुन पळाला. बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.