लक्ष्मणराव ढोबळेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: September 13, 2014 19:09 IST2014-09-13T11:35:51+5:302014-09-13T19:09:59+5:30

राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने दाखल केली असून ढोबळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Laxmanrao Chopra filed a rape case against him | लक्ष्मणराव ढोबळेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

लक्ष्मणराव ढोबळेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने दाखल केली असून ढोबळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ही महिला ढोबळे यांच्या नालंदा महाविद्यालयात काम करते. अश्लील फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत ढोबळेंनी आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.  ढोबळेंविरोधात कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ढोबळे यांच्या संस्थेमध्ये लिपिक म्हणून काम करणा-या या महिलेने २०११ ते २०१३ या कालावधीत आपल्यावर बलात्कार केल्याचे आरोप आहेत.
तर, सदर महिलेने इतक्या उशीरा का आरोप केले असे विचारतानाच सदर महिलेचे गैरव्यवहार उघडकीस आल्यावर सुडबुद्धीने हे आरोप केल्याचा दावा ढोबळे यांनी केला आहे. या महिलेच्या संदर्भात सर्व ती माहिती पोलीसांना दिली असल्याचेही ते म्हणाले.
ढोबळे यांनी बलात्काराचे आरोप फेटाळून लावले असून आपले चारित्र्यहनन करण्यासाठी विरोधकांनी रचलेला डाव आहे, असा प्रति आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: Laxmanrao Chopra filed a rape case against him