कोल्हापूर : राज्यात कायद्याचा बोजवारा उडाला आहे. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. वाढत्या गुन्हेगारी घटना लक्षात घेता राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. कोल्हापुरात आमदार पाटील पत्रकारांशी बोलत होते.बदलापूर घटनेचा आम्ही निषेध करतो; पण, असं कृत्य करण्याचं धाडस कसं केलं जातं? या सगळ्या घटनांना सरकार जबाबदार आहे. अशा घटनेतील आरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक केलं जातं. त्यामुळेच गुन्हेगारी घटना घडल्या जात आहेत.
अशा प्रवृत्तीच्या लोकांचं धाडस वाढतं, स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत, मुख्यमंत्री म्हणून सर्वच खात्याचे प्रमुख असतात; मग गृहखाते आपल्याकडे कशाला ठेवता? अशी विचारणाही त्यांनी केली.
Web Summary : Citing rising crime, Congress leader Satej Patil demands a dedicated Home Minister for Maharashtra. He criticized the government's handling of crime and accused BJP of supporting criminals, leading to increased audacity in criminal activities.
Web Summary : कांग्रेस नेता सतेज पाटिल ने बढ़ते अपराध का हवाला देते हुए महाराष्ट्र के लिए एक समर्पित गृह मंत्री की मांग की। उन्होंने अपराध से निपटने में सरकार की आलोचना की और भाजपा पर अपराधियों का समर्थन करने का आरोप लगाया, जिससे आपराधिक गतिविधियों में वृद्धि हुई है।