मातृदुग्ध संकलन प्रकल्पाचे लोकार्पण

By Admin | Updated: August 2, 2016 01:15 IST2016-08-02T01:15:16+5:302016-08-02T01:15:16+5:30

भारतातील पहिल्या फिरत्या मातृदुग्ध संकलन वाहिकेचे सोमवारी लोकार्पण झाले.

Launch of Maternal Compilation Project | मातृदुग्ध संकलन प्रकल्पाचे लोकार्पण

मातृदुग्ध संकलन प्रकल्पाचे लोकार्पण


पुणे : भारतातील पहिल्या फिरत्या मातृदुग्ध संकलन वाहिकेचे सोमवारी लोकार्पण झाले. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
रोटरी क्लब आॅफ पूना व बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय यांच्या वतीने हा नावीन्यपूर्ण व अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या पथकाच्या वाहनात शीतपेटी, विशेष खुर्च्या, बे्रस्ट मिल्क पम्प, वातनुकूलित यंत्रणा व इन्व्हर्टर यांची सोय आहे़
बालरोगचिकित्साशास्त्र प्रमुख डॉ़. संध्या खडसे म्हणाल्या ‘‘भारतातील स्तनपानाचा दर वाढविण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल ससून रुग्णालयाने उचलले आहे़ याअंतर्गत आठवड्यातून तीन दिवस काम होणार असून, प्रत्येक मातेच्या दारी जाऊन मातेच्या दुधाचे संकलन करून ते गरजू बालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाईल.’’ प्रशांत देशमुख म्हणाले, ‘‘भविष्यात लोकहितकारी प्रकल्प साकार होतील.’’ (प्रतिनिधी)
‘‘इतर अवयवांच्या दानाप्रमाणे मातृदुग्धदान हे सर्वांत श्रेष्ठ दान आहे़ या प्रकल्पामुळे कोणतेही गरजू बालक मातेच्या दुधापासून वंचित राहणार नाही,’’ असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़ अजय चंदनवाले यांनी सांगितले. दूधदानाबाबत समाजात जागरूकता निर्माण होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Launch of Maternal Compilation Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.