लोकमत सौरऊर्जा प्रकल्पाचे आज लोकार्पण
By Admin | Updated: March 24, 2015 01:44 IST2015-03-24T01:44:41+5:302015-03-24T01:44:41+5:30
सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मंगळवारी सकाळी १० वाजता एका शानदार समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

लोकमत सौरऊर्जा प्रकल्पाचे आज लोकार्पण
लोकार्पण : ‘क्लीन व ग्रीन’ ऊर्जा वापणारे देशातील एकमेव वृत्तपत्रसमूह, नागपूर आणि औरंगाबाद प्रकल्प आत्मनिर्भर
नागपूर : लोकमत मीडिया प्रा.लि.तर्फे नागपूर (बुटीबोरी) येथील लोकमतच्या अद्ययावत मुद्रण प्रकल्पात उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मंगळवारी सकाळी १० वाजता एका शानदार समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार व ‘द हितवाद’चे व्यवस्थापकीय संपादक बनवारीलाल पुरोहित, हिंगण्याचे आमदार समीर मेघे उपस्थित राहतील.
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन
आणि खासदार विजय दर्डा हे
यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. बुटीबोरी औद्योगिक वसाहत परिसरातील लोकमतच्या अद्ययावत मुद्रण प्रकल्पात हा समारंभ
पार पडेल.
वृत्तपत्राच्या छपाईसाठी लागणारी ‘क्लीन व ग्रीन’ ऊर्जा निर्माण करणारे ‘लोकमत’ हे देशातील प्रथमच वृत्तपत्रसमूह आहे, हे विशेष. या प्रकल्पाद्वारे देशात प्रदूषणमुक्त वातावरण तयार करण्याच्या दिशेकडे ‘लोकमत’ने पाऊल टाकले आहे. (प्रतिनिधी)
च्‘लोकमत’ समूहातर्फे नागपूर येथील बुटीबोरी व औरंगाबाद नजीकच्या शेंद्रा परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. बुटीबोरी येथील प्रकल्पाची क्षमता ३२४ केव्ही (किलोव्होल्ट) इतकी असून, प्रति दिवशी सौरकिरणांपासून १५०० ते १८०० युनिट विजेची निर्मिती करता येणे शक्य आहे.
च्‘लोकमत’ला यापैकी १४०० ते १५०० युनिट विजेची आवश्यकता आहे. उर्वरित ३०० ते ४०० युनिट वीज ‘इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन नेटवर्क’मध्ये जाईल. याचप्रमाणे औरंगाबादचा प्रकल्प २५८ केव्हीचा असून,
१२०० ते १४०० युनिट वीज निर्माण होऊ शकते. दोन्ही प्रकल्प मिळून प्रति दिवशी ५०० ते ६०० युनिट वीज ‘इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन नेटवर्क’मध्ये जाणार आहे.