लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दि इयर पुरस्कार सोहळ्याचे आज प्रक्षेपण

By Admin | Updated: April 23, 2017 03:37 IST2017-04-23T03:37:52+5:302017-04-23T03:37:52+5:30

‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ हे सार्थ नामाभिधान अभिमानाने मिरवत चांद्यापासून बांद्यांपर्यंत विस्तारलेल्या वर्धिष्णु अशा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने ११ एप्रिल २०१७ रोजी मुंबईत

Launch of Lokmat Maharashtrian's Day of the Year award ceremony today | लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दि इयर पुरस्कार सोहळ्याचे आज प्रक्षेपण

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दि इयर पुरस्कार सोहळ्याचे आज प्रक्षेपण

मुंबई : ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ हे सार्थ नामाभिधान अभिमानाने मिरवत चांद्यापासून बांद्यांपर्यंत विस्तारलेल्या वर्धिष्णु अशा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने ११ एप्रिल २०१७ रोजी मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात मराठी भाषा, मराठी माती आणि महाराष्ट्राची शान वाढविणाऱ्या विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा गौरव केला. या सोहळ्याचे प्रक्षेपण रविवारी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर दुपारी ३ वाजता तर, ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर दुपारी ४ वाजता होणार आहे.
याशिवाय ‘आज तक’ या वृत्तवाहिनीवर सोमवारी दुपारी ४.३० वाजता हा सोहळा पाहता येईल. यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर’ पॉवर्ड बाय कर्म इन्फ्रास्ट्रक्चर आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने हा चौथा पुरस्कार सोहळा झाला. यंदाच्या पर्वात ‘लोकसेवा-समाजसेवा’, ‘परफॉर्मिंग आर्ट््स’, ‘कला’, ‘क्रीडा’, ‘रंगभूमी’, ‘मराठी चित्रपट’, ‘उद्योग’, ‘पायाभूत सेवा’, ‘राजकारण’, ‘प्रशासन (आश्वासक)’ आणि ‘वैद्यकीय’ अशा १४ क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.
जगभरातील वाचकांनी ‘लोकमत’च्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती, तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरले. जगभरातील तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली. (प्रतिनिधी)

Web Title: Launch of Lokmat Maharashtrian's Day of the Year award ceremony today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.