आयआयटीच्या ई यंत्र स्पर्धेला प्रारंभ
By Admin | Updated: April 11, 2015 02:28 IST2015-04-11T02:28:08+5:302015-04-11T02:28:08+5:30
देशातील आभियांत्रिक महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आयआयटी मुंबईच्या

आयआयटीच्या ई यंत्र स्पर्धेला प्रारंभ
मुंबई : देशातील आभियांत्रिक महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आयआयटी मुंबईच्या ई यंत्र स्पर्धेच्या अंतिम फेरीला शुक्रवारपासून सुरु झाली. यामध्ये अंतिम फेरीत पोहचलेल्या ११ महाविद्यालयांमधील शिक्षकांनी आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.
आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ई यंत्र परिसंवादाचे उद्घाटन प्राचार्य कवी आर्य यांच्या हस्ते झाले. ई-यंत्र रोबोटीक परिसंवादासाठी देशभरातून ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून १३ महाविद्यालयांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. शिक्षकांना प्रकल्प सादरीकरणासाठी ‘व्हालेट पार्कीग’ ही थीम देण्यात आली होती.
विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ई-यंत्र आयडिया शेअर या स्पर्धेत देशभरातून १०३ प्रकल्पांची नोंद झाली होती. त्यामधील सर्वोत्तम ११ प्रकल्प प्रदर्शनात मांडले आहेत. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर हे प्रकल्प तयार केले आहेत. हा परिसंवाद शनिवार, ११ एप्रिलपर्यंत चालणार आहे. शिक्षक व विद्यार्थांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)