‘प्रथम’ लघू उपग्रहाचे प्रक्षेपण महिनाअखेरीस

By Admin | Updated: September 14, 2016 06:03 IST2016-09-14T06:03:41+5:302016-09-14T06:03:41+5:30

त्सुनामी’सारख्या महाप्रलयाची पूर्वकल्पना देऊ शकणारा आयआयटी मुंबईचा ‘प्रथम’ लघू उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाला आहे

The launch of the 'first' small satellite is at the end of month | ‘प्रथम’ लघू उपग्रहाचे प्रक्षेपण महिनाअखेरीस

‘प्रथम’ लघू उपग्रहाचे प्रक्षेपण महिनाअखेरीस

मुंबई : ‘त्सुनामी’सारख्या महाप्रलयाची पूर्वकल्पना देऊ शकणारा आयआयटी मुंबईचा ‘प्रथम’ लघू उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाला आहे. या लघू ग्रहाचे प्रक्षेपण इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन (इस्रो) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन सेंटरमधून सप्टेंबरच्या अखेरीस करणार
आहे.
आयआयटी मुंबईच्या एअरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाने जुलै २००७मध्ये ‘प्रथम’ नावाचा उपग्रह तयार केला. एअरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाच्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तमासकर यांच्या संकल्पनेतून हा उपग्रह बनवण्यात आला. २००९ साली इस्रोसोबत या लघू उपग्रहासंदर्भात सामंजस्य करार झाला. हा करार २०१४ पर्यंत वाढविण्यात आला, पण या लघू उपग्रहाच्या प्रक्षेपणाला इस्रोचा हिरवा कंदील मिळत नव्हता. अखेर आठ वर्षांनंतर इस्रोकडून ‘प्रथम’ ला हिरवा कंदील मिळाला असून, महिन्याअखेरीस त्याचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून होणार आहे.
प्रथम या उपग्रहाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांनी घेतली आहे. नासाचे माजी प्रशासक डॉ. मायकल ग्रिफीन यांनी विद्यार्थ्यांच्या या शोधाचे आणि कल्पक वृत्तीचे कौतुक केले, शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमधूनही
‘प्रथम’चे कौतुक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The launch of the 'first' small satellite is at the end of month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.